ठाकरे बंधू एकत्र येणार? नितेश राणेंची सकारात्मक प्रतिक्रिया, पण “लोकंं शकूनी मामाच्या भूमिकेत…” असं कोणाला म्हणाले?

Nitesh Rane : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा केली जात आहे. त्यांच्या एकत्र येण्याच्या होत असलेल्या चर्चांवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. आता यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री नितेश राणे गडचिरोलीला जाण्यापूर्वी नागपूरमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या सुरू असलेल्या चर्चेवर आपले मत मांडले.
ठाकरे कुटुंब म्हणून ते एकत्र येत असेल, तर चांगली गोष्ट आहे, पण काही अनेक लोकं शकूनी मामाच्या भूमिकेत असल्याची टीका त्यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे नेते राज ठाकरे या दोन्ही भावांनी काय करावे, हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. त्यावेळी ठाकरे कुटुंब तोडले तेच आता ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची भाषा करत असल्याचे ते म्हणाले.
…तर मासेमारीचे उत्पादन वाढेल
छोट्या तलावांमधील मासेमारी कंत्राटावर स्थगिती कायम ठेवली आहे. तर मोठ्या तलावाबद्दलची स्थगिती काढलेली आहे. त्यामुळे तिथे मासेमारीच्या कंत्राटासाठी स्पर्धा होईल, याचा फायदा मासेमारांचा होईल, परिणामी भारतात मासेमारीचे उत्पादन वाढेल, असेही देखील मंत्री नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा: कॅनडाचा नवा कडक कायदा ; भारतीय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक?, काय आहे कायदा जाणून घ्या





