Vedat Marathe Veer Daudale Saat : ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ सिनेमा रिलीज होणार की नाही? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

Vedat Marathe Veer Daudale Saat Updates : नुकताच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आभाराच्या भाषणात मांजरेकांनी मराठी सिनेमाची तारीफ करत या वर्षी चांगली भेट देणार असल्याचं जाहीर केलं. पण मग महेश मांजरेकरांनी ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या सिनेमाची घोषणा केली होती. त्याबद्दल नंतर काहीच समोर आलं नव्हतं. मात्र, आता या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ज्यावेळी वेडात मराठी वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा आणि मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. त्यावेळी सिनेमाच्या पोस्टरवरून मोठा वादा निर्माण झाला होता. त्यानंतर कुठेही या सिनेमाबाबत काहीही समोर आलं नाही. त्यामुळे हा सिनेमा बंद झालं का? अशीही चर्चा दरम्यानच्या काळात सुरू होती. मात्र, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने सिनेमाविषयी मोठी अपडेट दिली आहे.
काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार असलेल्या वेडात मराठी वीर दौडले सात सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमात जिवाची पाटील ही भूमिका साकारणारा अभिनेता विराट मडके याने सिनेमा खूप सुंदर शूट झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा खूप चांगला बनला असल्याचे त्याने सांगितले आहे. नुकतीच त्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे.
सिनेमा मस्त झाला आहे लोकांना खूप आवडेल. मीही दोन अडीच वर्षांपासून सिनेमाची वाट बघतोय. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा खूप चांगला बनला आहे. प्रतापरावांसोबत जे सहा जण लढलेले ते नक्की कोण होते याचा ठाम उत्तर कोणाकडेच नाही. याबाबत अधिकृत नोंदही नाही. बाबासाहेब पुरंदरेंनी जी नाव लिहिली तीच लोकप्रिय झाली आहेत, असे त्याने सांगितले. महेश सरांनी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून हे सहावीर दाखवले आहेत, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
विराट मडकेने केला खुलासा
प्रत्येकाची कथा खूप छान गुंफली आहे. अक्षय कुमारने सुद्धा खूप छान भूमिका निभावून नेली आहे. त्यात पाहून त्याला मराठी येत नाही असं वाटत नाही, असा खुलासाही विराट मडकेने केला आहे. या सिनेमात अक्षय कुमार याच्यासह महेश मांजरेकरांचा मुलगा सत्य मांजरेकर, प्रवीण तरडे, विशाल निकम, हार्दिक जोशी, जय दुधाने, विराट मडके, आणि उत्कर्ष शिंदे ही स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा सुरू झाली असली, तरी सिनेमा रिलीज कधी होणार याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.
हेही वाचा : दिसतंय तेवढं सोपं नाही ! ट्रम्प टॅरिफमध्ये मोठी खेळी ; भारताकडे आहेत ‘हे’ पर्याय




