जालन्यातून माविआसोबत लोकसभा लढणार का ? मनोज जरांगे पाटील म्हणतात..

Manoj jarange Loksabha : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत थेट मनोज जरांगे यांना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. खरतर वंचितच्या या मागणीनंतर माविआ नेते याबाबत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी वंचितच्या या मागणीबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे यांना त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण मराठा समाजाने पाठींबा दिला होता. मात्र सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन वेगळं आरक्षण जाहीर केलं यानंतर आता जरांगे यांच्या निवडणूक लढण्याचा मुद्दा थेट माविआच्या चर्चेत गाजल्याने सर्वांच्याचे लक्ष त्या दिशेने वेधले गेले. त्यानंतर आता माध्यमांशी बोलताना स्वतः जरांगे यांनी निवडणूक लढण्याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. | Manoj jarange Loksabha
महाविकास आघाडीकडून जालना मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार का ? असा सवाल मनोज जरांगे यांना विचारला असता ते म्हणाले,”सध्या माझं पूर्ण लक्ष हे मराठा आरक्षणावर आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही. मराठ्यांची लेकरं मोठी व्हावी, यासाठी माझी झुंज चालू असल्याचं जरांगे यांनी म्हंटले आहे.
याबाबत बोलताना जरांगे पुढे म्हणाले,”माझ्यासाठी समाज हा सर्वात मोठा आहे. मी माझ्या समाजासाठी काम करत राहीन, लढत राहीन” असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.तसेच साखळी उपोषणाद्वारे हा लढा पुढे असाच सुरु ठेवणार असल्याचे देखील जरांगे यांनी यावेळी सांगितले. | Manoj jarange Loksabha
वंचितने माविआ बैठकीत नेमकी काय मागणी केली होती ?
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सोबत येण्याबाबत वंचितने महाविकास आघाडीच्या बैठकीत चार प्रमुख प्रस्ताव ठेवले होते. त्यातील एक प्रस्ताव जालना आणि पुण्यातील लोकसभेच्या लागेबाबत होता. जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ.अभिजित वैद्य यांना कॉमन कॅण्डीडेट म्हणून जाहीर करावे अशी मागणी या एका प्रस्तावातून वंचितने केली होती.




