….तर मनोज जरांगे यांच्याविरोधातच उपोषण; ‘या’ मराठा नेत्याने घेतला आक्रमक पवित्रा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या लढ्याला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी राज्य सरकारच्या पण नाकात त्यांनी दम आणला. या आंदोलनला एक वर्ष झाले पण अजूनही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. यानंतर आता मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला. त्यानंतर आपण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी घेतली आक्रमक भूमिका
महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? सोलापुरातील बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवानी मनोज जरांगे पाटील यांना असा सवाल विचारला आहे. आठ दिवसात या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मनोज जरांगे यांच्याविरोधात उपोषण करणार असल्याचे मराठा नेते अण्णासाहेब शिंदे म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? पुढील आठ दिवसात माझ्या या प्रश्नांचे निरसन न केल्यास बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.





