Election Commission Update | राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभाग रचना आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण यांसारख्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवरून या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर आज पहिल्या टप्प्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकतात. त्यानंतर ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका होण्याची शक्यता आहे. Election Commission Update | दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असल्याने राज्य निवडणूक आयोगावर वेळेचे बंधन आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुका तीन टप्प्यांत? निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. एकीकडे, मतदारयाद्यांमधील त्रुटी दूर झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान विरोधकांकडून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. Election Commission Update | हेही वाचा : तुर्कीमध्ये बंद दाराआड ७ मुस्लिम देशांची गुप्त बैठक ; पाकिस्तानच्या उपस्थितीत रचला मोठा कट?