टेलीग्राम बंद होणार? भारत सरकार अॅक्शन मोडवर; नेमकं कारण काय? जाणून घ्या…

Telegram May Banned In India| जगभरात टेलीग्राम या मेसेजिंग अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही दिवसांपूर्वीच टेलीग्राम या मेसेजिंग अॅपचे सीईओ पावेल ड्युराव यांना शनिवारी फ्रान्समध्ये अटक करण्यात आली. टेलीग्रामचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात असून त्यावर नियंत्रणत ठेवण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
टेलिग्रामवर खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर आता भारत सरकारकडूनही या ॲपबाबत तपास केला जाणार आहे. या तपासात टेलीग्राम अॅप दोषी आढळल्यास या अॅपवर भारतात बंदी घालण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, अशी माहित एका अधिकाऱ्याने दिली आहे. परंतु याबाबत टेलीग्रामकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
यूजीसी नेट परीक्षेतील घोटाळ्यादरम्यान अॅप चर्चेत
टेलीग्रामचे भारतात ५० लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. पण गेल्या काही वर्षांत टेलीग्राम हे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृतींसाठीचा अड्डा बनले आहे. या अॅपचा वापर करून गुन्हेगारांनी अनेकांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. मध्यंतरी यूजीसी नेट परीक्षेतील घोटाळ्यादरम्यानही हे अॅप चर्चेचा विषय बनले होते. UGC-NEET वादात सरकार अडचणीत आलं आहे. या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपर लीकमध्ये टेलिग्रामच्या सहभागाबाबतही सरकारनं चौकशी सुरू केली आहे. या परीक्षेचा पेपर फोडल्यानंतर या अॅपद्वारे तो विकण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. Telegram May Banned In India|
टेलिग्रामच्या माध्यमातून गुन्हेगारी स्वरूपाचे काम केल्याचा आरोप
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने टेलिग्रामच्या माध्यमातून चालवलेलं स्टॉक प्राईस रिगिंग रॅकेट उघडकीस आणले. भोपाळमधील दोघांना स्थानिक डॉक्टरांची 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यामध्येही या लोकांनी टेलिग्रामचा वापर केला होता. 19 जून 2023 रोजी होणारी UGC-NET परीक्षा टेलिग्रामवर पेपर लीक झाल्याच्या एका दिवसानंतर रद्द करण्यात आली. अनेक NEET-UG अर्जदारांना परीक्षेच्या एक दिवस आधी वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरच्या काही प्रती मिळाल्या होत्या.
दरम्यान, या प्लॅटफॉर्मवरून होत असलेल्या बेकायदेशीर कामांमुळे कडक नियम आणि देखरेखीची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे टेलिग्रामवर शेअर केलेल्या सामग्रीवर कठोर नियम लागू करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे सरकार टेलिग्रामवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. Telegram May Banned In India|
हेही वाचा:
गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर ; वडोदरात पुरामुळे 3 जणांचा मृत्यू, 7 बेपत्ता





