Tejas Thackeray : तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? आंदोलनातील उपस्थितीवरुन जोरदार चर्चा
Tejas Thackeray : उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे आता प्रत्यक्ष राजकारणात उतरणार का?, या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोर धरला आहे.

Tejas Thackeray : आतापर्यंत राजकारणापासून काहीसे दूर असलेले तेजस ठाकरे आता सक्रिय राजकारणात येणार का?, अशी चर्चा सुरू झाली आहे. हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, तेजस ठाकरे यांची रविवारी झालेल्या आंदोलनात उपस्थिती लावली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले होते. (Tejas Thackeray)
मुंबईतील शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात 11 ऑक्टोबर रोजी सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ठाकरेसेना आणि मनसेचे नेते आक्रमक झाले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही सेना भवन परिसरात दाखल झाले होते. (Tejas Thackeray)
आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले. या घडामोडींमुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रिय राजकीय भूमिकेत दिसू लागल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू असलेले तेजस ठाकरे हे प्रामुख्याने वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेशी संबंधित कामासाठी ओळखले जातात. (Tejas Thackeray)
आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी राजकारणापासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत सक्रिय भूमिका घेतली. मात्र, तेजस ठाकरे यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने राजकारणापासून दूर राहिलेल्या व्यक्तीची राहिली आहे. अनेकदा तेजस ठाकरे हे पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले पाहायला मिळाले आहेत. (Tejas Thackeray)
2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत ते दिसले होते. विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारावेळी ही त्यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली होती. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण तुरुंगातून सुटल्यावर मातोश्रीला गेले होते. (Tejas Thackeray)
त्यावेळीही तेजस ठाकरे तेथे दिसले होते. दसरा मेळावा आणि पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त अनेक वेळा तेजस ठाकरे मंचाच्या समोर बसलेले पाहायला मिळाले आहेत. (Tejas Thackeray)





