तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच अडकणार विवाहबंधनात?

Tamannaah Bhatia | बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा नेहमीच रंगलेली असते. अनेकदा दोघे एकत्र पहायला मिळतात. आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर आता तमन्ना आणि विजयच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. २०२५ मध्ये हे जोडपं लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. तेलुगू रिपोर्टनुसार, दोघंही २०२५ मध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचं सांगितले. लग्नानंतर राहण्यासाठी दोघंही आलिशान अपार्टमेंटच्या शोधातही आहेत. मात्र, अद्याप तमन्ना आणि विजय यांनी या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी डिसेंबर २०२२ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. तेव्हा दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अखेर २०२३ मध्ये तमन्ना भाटियाने एका मुलाखतीमध्ये विजयसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. Tamannaah Bhatia |
तमन्ना भाटियाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाले तर, तिने ‘स्त्री-२’ या सिनेमामध्ये आयटम सॉन्ग केलं होतं. या गाण्यासाठी तमन्नाचं कौतुक देखील झालं त्याचबरोबर तमन्ना जॉन अब्राहमच्या ‘वेद’ या सिनेमामध्येसुद्धा झळकली होती. Tamannaah Bhatia |
विजय वर्माने ‘डार्लिंग्स’, ‘मिर्झापूर २’, ‘दहाड’ आणि ‘जाने जान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ३४ वर्षीय तमन्ना भाटियाने केवळ साऊथ सिनेमातच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही विशेष ठसा उमटवला आहे. दरम्यान, आता चाहतेही तमन्ना आणि विजयच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. Tamannaah Bhatia |





