पुणे | गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहू : मोहोळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – डीएसके प्रकरणातील गुंतवणूकदारांच्या भावना आम्ही समजू शकतो. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले परत मिळाले पाहिजेत, हीच सर्वांची भावना आहे.
सरकारी पातळीवर पावले उचलू. वरिष्ठ कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा करून करून पुढे जाऊ. गुंतवणूकदारांनी काळजी करू नये. त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तोडग्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळयांनी दिले.
डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या कंपन्यांत ठेवी बुडलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या चैतन्य सेवाभावी संस्थेने (असोसिएशन ऑफ डीएसके फ्रॉड व्हिक्टिम्स) हिंदू महासंघाच्या पुढाकाराने मोहोळ यांची आर.सी. एम. कॉलेज येथील जनता भेटीच्या कार्यक्रमात भेट घेतली.
यावेळी जवळपास ५०० गुंतवणूकदार उपस्थित होते. गुंतवणूकदारांचे निवेदन स्वीकारल्यानंतर मोहोळ यांनी सरकार आणि पक्ष म्हणून देखील गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहू ,असे आश्वासन दिले. या वेळी महासंघाचे आनंद दवे उपस्थित होते.
या प्रकरणी आमचा विषय दिल्लीत मांडावा आणि केंद्रीय यंत्रणांनी कशा पद्धतीने आमचे पैसे बिल्डरच्या घशात घातले आहेत ते पाहून तोडगा काढावा,अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली. येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र करत बिल्डर्सच्या घरात आंदोलने होणार आहे,असेही आंदोलकांनी सांगितले.





