Sharad Pawar : आज शरद पवारांना डिस्चार्ज मिळणार? डॅाक्टरांनी दिली महत्वाची माहिती
Sharad Pawar : पुण्यातील रुबी हॅालमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार मुंबईला रवाना झाले होते. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना आणखी त्रास जाणवू लागल्यानंतर मुंबईतील ब्रीड कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती सुधारण असल्याची माहिती डॅाक्टरांनी दिली आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
पुण्यातील रुबी हॅालमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार मुंबईला रवाना झाले होते. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना आणखी त्रास जाणवू लागल्यानंतर मुंबईतील ब्रीड कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. याशिवाय त्यांना छातीत कफ देखील झाला असल्याची माहिती समोर आली होती.
आता डॅाक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृतीत पुरेशी सुधारणा झाल्यामुळे त्यांना आज ब्रीच कॅंन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. त्यामुळे आज शरद पवार घरी परतणार की उपचारांसाठी त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात थांबावे लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
अनेक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.




