Ketaki Chitale : मराठी न बोलल्याने भोकं पडणार आहेत का? केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त विधान

Ketaki Chitale : राज्यात हिंदी मराठी भाषेवरून वाद सुरू आहे. राज्य सरकाराने पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात येणार होती. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान देत ठाकरे बंधू मैदानात उतरले आणि सरकारला हिंदी भाषेचा निर्णय रद्द करावा लागला. तरीही महाराष्ट्रातील नुकत्याच घडलेल्या घटनांवरून मराठी का हिंदी असा वाद सुरूच आहे.
अशातच अभिनेत्री केतकी चितळे हिने या वादात उडी घेत वादग्रस्त विधान केले आहे. मराठी न बोलल्याने भोकं पडणार आहेत का? असे वादग्रस्त विधान तिने केले आहे. यामुळे आता तिच्या विधानावरून चहुबाजूंनी टीका केली जात आहे. याआधीही केतकी चितळेने अनेक वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला होता. आता पुन्हा एकदा तिने हे वादग्रस्त विधान करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
काय म्हणाली केतकी चितळे?
लोक यातून आपली असुरक्षितता दाखवत आहेत. मराठीतच बोल. मराठी कसं येत नाही, असा दाबव टाकला जात आहे. अरे समोरची व्यक्ती मराठीत बोलेल किंवा बोलणार नाही. समोरची व्यक्ती मराठी भाषेत बोलली नाही तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का? असा थेट सवाल तिने केला आहे.
तसेच समोरची व्यक्ती मराठी बोलली नाही तर भोकं पडणार आहेत का? मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची स्वत:ची असुरक्षितता दाखवत आहात. कोणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही, असं विधान केतकी चितळेने केलं आहे.
View this post on Instagram





