“शब्द देतो… शिवाजी राजेंच्या इतिहासाचे विकॄतीकरण होऊ देणार नाही” जितेंद्र आव्हाडांचे सूचक ट्विट

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी वर्तक नगर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने सशर्त जामीन देखील मंजूर केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत अनेक आरोप केले. यानंतर आव्हाड यांनी एक ट्विट करत सूचक इशारा दिला आहे.
ठाण्यामध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला होता. तसेच यावेळी प्रेक्षकांना मारहाण करण्याचा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आला होता. जामीन मिळाल्यानंतर आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात ते म्हणतात, “मला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेल मध्ये टाकनाऱ्या सरकारच्या विरिधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकरते उघड समर्थन देणारे नेते सुप्रिया सुळे,जयंत पाटील दिलीप वळसे पाटिल निलेश लंके व इतर अनेकांचे मनापासून आभार. शब्द देतो शिवाजी राजेंच्या इतिहासाचे विकॄतीकरण होऊ देणार नाही. ”
मला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेल मध्ये टाकनाऱ्या सरकारच्या विरिधात उभे रायहिलेले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकरते उघड समर्थन देणारे नेते #सुप्रियासुळे #जयंतपाटील #दिलीपवळसेपाटिल #निलेशlलंके व इतर अनेकांचे माना पासून आभार शब्द देतो शिवाजी राजेंच्या इतिहासाचे विकॄतीकरण होऊ देणार नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 12, 2022
आपल्याला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप देखील आव्हाड यांनी केला होता. ते म्हणाले, “वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांचा माझ्या अटकेशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलत दर मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू येणं बाकी होतं. सगळे पोलीस अधिकारी हतबल झाले होते. कारण असं अचानक कुणी कुणाला ताब्यात घेत नाही.”





