नितीन गडकरी ‘गड’ राखणार? काँग्रेसकडून तगडा उमेदवार उतरणार मैदानात

Nagpur Loksabha Election| आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात भाजपकडून नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरचा उमेदवार कोण असेल याबद्दल काँग्रेस नेते सध्यातरी काही बोलायला तयार नाहीत. परंतु सध्या काँग्रेसकडून गडकरी यांच्याविरोधात लढण्यासाठी एक नाव समोर येत आहे.
काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर नागपुरातील सर्व दिग्गज काँग्रेस नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे अभिजीत वंजारी यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. आता गट तट विसरून नागपूरची निवडणूक पूर्ण ताकतीने लढवू असा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे लढत
गेली दोन लोकसभा निवडणूक काँग्रेस नागपुरातून पराभूत झाली आहे. मात्र यंदा नागपुरातून काँग्रेस खासदार असाच आमचा निर्धार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी दिली आहे. तर आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात निवडणूक लढण्यास तयार आहोत, अशी सूचक प्रतिक्रिया आमदार विकास ठाकरे यांनी दिली आहे. Nagpur Lok Sabha Election|
विकास ठाकरे नागपूरचे महापौर राहिलेले आहेत. नागपुरात ते गडकरींना चांगली लढत देऊ शकतील, असे चित्र कॉंग्रेसच्या नेत्यांकडून उभे केले जात आहे. याआधीच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा सुमारे पावणे तीन लाखांच्या मताधिक्यांनी पराभव केला होता. Nagpur Lok Sabha Election|
त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लढले होते. त्यांचाही सुमारे सव्वा दोन लाखांच्या मतांच्या फरकाने पराभव झाला. यामुळे गडकरींच्या विरोधात लढायचे तर उमेदवारही तेवढाच तगडा हवा आणि नागपूरच्या राजकारणात विकास ठाकरे काँग्रेसचे वजनदार नेते मानले जातात.
दरम्यान, 2014 पासून पक्षाला सतत निवडणूक पराभवाचा सामना करावा लागत आहे. एकेकाळी नागपूर हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला मानला जात होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत गडकरी यांचे येथे मोठे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:
“ठिगळ्या ठिगळ्यांची गोधडी म्हणजे भाजपा” ; राज ठाकरेंवरून ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची सडकून टीका





