‘मुंबई पुणे मुंबई 4’ येणार का? स्वप्नील जोशीने दिले उत्तर…

Mumbai Pune Mumbai 4 | अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसते. त्यांच्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचे तिन्हीही भाग सुपरहिट ठरले होते, त्यानंतर आता या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चर्चा रंगली आहे. नुकतेच स्वप्नीलने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला त्यावेळी त्याने ‘मुंबई पुणे मुंबई 4’ विषयी एक हिंट दिली आहे.
स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर त्याच्या फॅन्ससोबत सेशन केलं, यात प्रेक्षकांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. यातील एका प्रश्नानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. एका चाहत्याने स्वप्नीलला मुंबई पुणे मुंबई 4 येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत स्वप्नील जोशी म्हणाला, ‘जे कोणी ‘मुंबई पुणे मुंबई 4′ विषयी विचारत आहेत. त्यांच्यासाठी कधीच नाही असा विचार करू नका.’
त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोघांना ही पोस्ट टॅग केली आहे. स्वप्नीलच्या या उत्तरानंतर प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. Mumbai Pune Mumbai 4 |
स्वप्नील जोशीच्या स्टोरीनंतर मुंबई पुणे मुंबई 4 नक्की येणार का? स्वप्नील आणि मुक्ताची सुपरहिट जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे. दरम्यान, या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होऊन सहा वर्ष झाली आहेत. आता स्वप्नील आणि मुक्ताला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास अनेकजण उत्सुक आहेत. Mumbai Pune Mumbai 4 |
हेही वाचा:
शरद पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट; म्हणाले “सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर…”





