Mint Water: पुदिन्याच्या पाण्यात दडलेला आहे चांगल्या आरोग्याचा खजिना; पण कसे आणि कधी प्यावे हे जाणून घेणे महत्त्वाचे
Mint Water: पुदिना फक्त उन्हाळ्यातच उपयोगी असतो असे नाही, तर हिवाळ्यातही तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. योग्य प्रमाणात पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केल्यास पचन सुधारते, शरीराला थंडावा मिळतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Mint Water: पुदिना फक्त उन्हाळ्यातच उपयोगी असतो असे नाही, तर हिवाळ्यातही तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. योग्य प्रमाणात पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केल्यास पचन सुधारते, शरीराला थंडावा मिळतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, पुदिना अशी औषधी वनस्पती आहे जे शरीराला अनेक प्रकारे फायदा करून देते. रोज पुदिन्याचे पाणी पिल्याने पोटाशी संबंधित त्रास कमी होतात. मात्र, त्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी कधी आणि कस प्याव हे जाणून घेणे गरजेचे आहे.
ॲसिडिटी, अपचन आणि गॅसवर गुणकारी
पुदिन्याच्या पाण्यामुळे ॲसिडिटी, अपचन आणि गॅससारख्या समस्या कमी होतात. पुदिन्यातील मेंथॉल हे घटक अन्न लवकर आणि चांगले पचण्यास मदत करतात.
तोंडाची दुर्गंधी घालवते
ज्यांना तोंडातून दुर्गंधी येते त्यांच्यासाठी पुदिन्याचे पाणी नैसर्गिक माउथ फ्रेशनरचे काम करते. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि श्वास ताजा राहतो.

Mint Water
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत
पुदिन्याचे पाणी मेटाबॉलिझम सुधारते आणि भूक कमी करते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज टाळल्या जातात आणि वजन नियंत्रणात राहते.
त्वचेसाठी फायदेशीर
पुदिन्याचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ व चमकदार दिसते.
ताणतणाव आणि डोकेदुखीत आराम
पुदिन्याचे पाणी मेंदूला शांत ठेवण्यास मदत करते. ताण कमी होतो आणि डोकेदुखीमध्येही आराम मिळतो.
पुदिन्याचे पाणी कधी प्यावे?
पुदिन्याच्या पाण्याचा जास्त फायदा घ्यायचा असेल तर सकाळी उपाशीपोटी ते प्या. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि गॅसचा त्रास कमी होतो. रात्री जेवणानंतरही ते घेऊ शकता. मात्र, झोपण्याआधी जास्त प्रमाणात पुदिन्याचे पाणी पिणे टाळा.
पुदिन्याचे पाणी कसे तयार करावे?
१० ताजी पुदिन्याची पाने घ्या आणि एका ग्लास पाण्यात १० मिनिटे उकळा. नंतर गाळून थंड झाल्यावर प्या. किंवा पुदिन्याची पाने रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते गाळून त्यात चवीपुरता लिंबू किंवा मध घालून पिऊ शकता.
कोणी पुदिन्याचे पाणी टाळावे?
गर्भवती महिला, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण किंवा ज्यांना गंभीर आरोग्य समस्या आहेत, त्यांनी पुदिन्याचे पाणी मर्यादित प्रमाणातच घ्यावे. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
योग्य पद्धतीने पुदिन्याचे पाणी पिल्यास ते आरोग्यासाठी खूपच लाभदायक ठरू शकते.





