पुणे | पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे हे वेगाने विकसित होणारे महानगर आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आम्ही भाजपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा पाया भक्कम करण्यास सुरूवात केली.
या माध्यमातून मेट्रो, ई-बस खरेदी, रेल्वे, विमानतळ, रिंगरोड, वृक्षारोपण योजना, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कायदा-सुव्यवस्था, उद्योगधंद्यांना अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत मला पुण्याला देशाचे सर्वोत्कृष्ट शहर बनवायचे आहे. अशा भावना भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे आपली वाटचाल सुरू आहे. आपल्या मतामुळे देशाच्या आणि पर्यायाने पुण्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भरघोष मतांनी पुणेकर आपल्याला निवडून देतील असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
प्रचाराच्या अनुभव वेगळाच
लोकसभा निवडणक प्रचाराबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, “संपूर्ण प्रचार काळात शहरातील वाड्या-वस्त्यांपासून, सोसायट्यांना भेटी दिल्या. आबालवृद्ध, महिला, युवकांनी भरभरून स्वागत केले. या निमित्ताने त्या त्या भागातील नागरी प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांतील भाजपच्या सत्ताकाळात झालेली विकासकामे आणि विविध योजनांचा लाभार्थ्यांना मिळालेले लाभ याबद्दल नागरिक भरभरून बोलत होते.
कोरोना काळात आम्ही महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामाची लोकांना जाणीव होती. ती त्यांनी पदोपदी बोलून दाखवली. पुणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मला पुणेकरांकडून खूप प्रेम आणि विश्वास मिळाला. यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे.
तर पारंपरिक प्रचार, पथनाट्य, वासुदेव यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ रथ, समाजमाध्यमे, वेबसाइट, वर्तमानपत्रे, इलेक्टॉनिक मीडिया यांच्या माध्यमांतून प्रभावी प्रचार केला’ असाही विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
नेत्यांचे मानले आभार
आपल्या प्रचारात सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर,
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या महायुतीच्या नेत्यांचे त्यांनी यावेळी बोलताना विशेष आभार मानले.





