करण जोहर पुन्हा सापडणार वादात ? खास नेपोटीजमवर आधारित करणार ‘हा’ नवीन शो

मुंबई – निर्माता दिग्दर्शक करण जोहर तसा कॉँट्रव्हर्सीपासून लांबच असतो. मात्र असं असलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याच नाव सतत चर्चेत असत.कधी त्याच्यावर एखादी अभिनेत्री आरोप करते तर कधी तो रिऍलिटी शोमध्ये वादग्रस्त विधान करतो. एवढंच काय करणवर अनेकदा घराणेशाहीचे आरोप देखील झालेले आहेत. अशात आता करण जोहर स्वतः नेपोटिझमवर शो घेऊन येत आहे.
चित्रपटसृष्टीमध्ये घराणेशाहीवर काही ना काही चर्चा होत असते, अनेकदा ‘नेपोटीजम’ हा शब्द चर्चेचा विषय बनतो. करण जोहर आपल्या रोमँटिक चित्रपटांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि त्याचा कॉफी विथ करण हा शो देखील चर्चेचा विषय राहिला आहे. आता त्याच्या शोशी संबंधित एक नवीन अपडेट समोर येत आहे. करण जोहर आता नेपोटिझमवर शो करणार असल्याचे समजते.
काजोलच्या वेब सीरिज ‘द ट्रायल ट्रेलर’ लाँचच्या निमित्ताने एचएसएम एंटरटेनमेंट नेटवर्कचे हेड कंटेंट गौरव बॅनर्जी यांनी ‘शोटाइम’बद्दल ही माहिती दिली. डिस्नेवर आणखी काय नवीन येत आहे ते त्याने सांगितले. तो म्हणाला की, करण जोहर ‘शोटाइम’ नावाचा शो आणणार आहे. जो बॉलिवूड नेपोटिझमवर आधारित असेल.
येत्या काही दिवसांत हॉटस्टारवर अनेक सिरीज येणार आहेत. याविषयी तो नीरज पांडेसोबतही सिरीज करणार असल्याचे त्याने सांगितले. त्याची लवकरच घोषणा देखील केली जाणार आहे. याशिवाय क्रिमिनल जस्टिस, आर्य आणि स्पेशल ऑप्सचे नवे सीझनही येणार आहेत.





