मुलींच्या लग्नासाठी भाजप देणार 51 हजार रुपये; वाचा BJPच्या जाहीरनाम्यातील घोषणा

सिमला – भारतीय जनता पक्षाचा हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यातही भाजपने हिमाचलात समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. आपले सरकार पुन्हा निवडून आल्यास महिलांना सरकारी नोकरीत 33 टक्के आरक्षण लागू कण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून राज्यात नवीन उच्च शिक्षण संस्था सुरू करण्याचे आश्वासनही भाजपने दिले आहे.
भाजपा का संकल्प-
राज्य की सरकारी नौकरियों और शैक्षणिक संस्थानों में महिलाओं के लिए 33% आरक्षण सुनिश्चित करेंगे।#BJPwithNariShakti pic.twitter.com/a3D6xblaym
— BJP Himachal Pradesh (@BJP4Himachal) November 6, 2022
विकास आणि हिंदुत्व असे मिश्रण असलेल्या या जाहीरनाम्यात सहावी ते बारावीत शिकणाऱ्या मुलींना मोफत सायकल देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आठ लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना स्कूटर, राज्यात पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडणार अशी आश्वासनेही यात देण्यात आली आहेत. तसेच बीपीएल कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये देणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
अब बीपीएल परिवारों की बेटियों की शादी में भाजपा सरकार करेगी मदद।
उनकी शादी के लिए वित्तीय सहायता के लिए 51,000 रुपये दिए जाएंगे।#BJPwithNariShakti pic.twitter.com/XreNghcYsY
— BJP Himachal Pradesh (@BJP4Himachal) November 6, 2022
आपल्या जाहीरनाम्यात ज्या मोफतच्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्या फुकटेगिरीच्या स्वरूपातील योजना नाहींत तर सामान्यांना सक्षम करण्यासाठीच्या त्या योजना आहेत असे जे. पी. नढ्ढा यांनी यावेळी नमूद केले. मतदारांना खूष करण्यासाठी ज्या मोफतच्या योजना जाहीर केल्या जातात त्याचे वर्णन मोदींनी रेवडी वाटप असे केले होते. त्या पार्श्वभूमीवर नढ्ढा यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात याही पेक्षा मोठी आश्वासने देण्यात आली आहेत त्या विषयी विचारले असता नढ्ढा म्हणाले की कॉंग्रेसला मोठमोठ्या घोषणा करण्याची सवय आहे पण ते आपली आश्वासने कधीच पाळत नाहीत असे नढ्ढा म्हणाले.
केंद्रीय गृह मंत्री श्री @AmitShah जी ऊना विधासभा क्षेत्र में जनसभा को संबोधित कर रहे हैं।
#BJPVijaySankalphttps://t.co/2H5kQNg1tA— BJP Himachal Pradesh (@BJP4Himachal) November 6, 2022





