Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अशातच ती पुन्हा एकदा बॅालीवूड इंडस्ट्रीत कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तिला बॅालीवूडमध्ये पाहण्यास तिचे चाहते खूप उत्सुकत आहेत. देसी गर्ल सहा वर्षांनी एसएस राजामौली यांच्या “वाराणसी” या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत परतणार आहे. याशिवाय प्रियांका पुन्हा एकदा एकदा बॉलीवूडमध्ये परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत स्वतः प्रियाकांने एका मुलाखतीत तसे संकेत दिले आहेत. ‘डॉन ३’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटातील रणवीर सिंहचा दमदार लूक समोर आल्यानंतर अभिनेत्री कियारा अडवाणची देखील महत्वाची भूमिका असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण कियाराने हा चित्रपट ती गरोदर कारणाने सोडला. त्यानंतर मोठ्या अडचणींचा सामाना चित्रपटाला करावा लागला. अशातच काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहने ‘डॉन ३’ चित्रपट सोडल्याची बातमी समोर आली आहे. काही माध्यमांनी असाही दावा केला आहे की, शाहरुख खान पुन्हा एकदा “डॉन” फ्रँचायझीसाठी फरहान अख्तरसोबत काम करू शकतो. या सगळ्यात आता अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या डॅान ३ मध्ये दिसू शकते. याशिवाय क्रिश ४ चा देखील ती भाग असू शकते, असे देखील सांगण्यात आले आहे. नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, जेव्हा प्रियांका चोप्राला विचारण्यात आले की ती क्रिश ४ आणि डॉन ३ साठी परत येईल का, तेव्हा तिने “मला माहित नाही की मी यापैकी कोणत्याही चित्रपटाबद्दल बोलू शकेन की नाही.” असे उत्तर दिले. यामुळे या दोन मोठ्या चित्रपटात ती दिसणार की नाही याची स्पष्टता आलेली नाही. पण या दोन्ही चित्रपटात ती झळकल्यास चाहत्यांचा आनंद गगणात मावनेसाच होईल, हे मात्र नक्की. प्रियांका चोप्राच्या “वाराणसी” चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर देसी गर्ल या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : Anil Kapoor Look : अनिल कपूर यांचा ‘झक्कास’ लुक; रितेश देशमुख कमेंट करत म्हणाला…