Priyanka Chopra: प्रियंका चोप्राच्या नव्या प्रवासाची चाहत्यांमध्ये चर्चा; डोळ्यांच्या सौंदर्याने वेधलं लक्ष
Priyanka Chopra प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या मागील काही दिवसांतील खास क्षण पाहायला मिळतात. काही फोटोंमध्ये ती अतिशय स्टायलिश आणि आकर्षक दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये ती निवांत वेळ घालवत असल्याचं दिसतं.

Priyanka Chopra: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. प्रियंका नेहमीच आपल्या कामासोबत वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट करत “माझ्या नव्या टप्प्याची सुरुवात” अस कॅप्शन दिल आहे. तिच्या या पोस्टने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या मागील काही दिवसांतील खास क्षण पाहायला मिळतात. काही फोटोंमध्ये ती अतिशय स्टायलिश आणि आकर्षक दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये ती निवांत वेळ घालवत असल्याचं दिसतं. तिच्या या फोटोंमधील डोळ्यांचं सौंदर्य विशेष चर्चेत आलं आहे. चाहत्यांनी तिच्या डोळ्यांचं आणि नैसर्गिक सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
काही फोटोंमध्ये प्रियंका स्किन केअर करताना दिसते. फेस मास्क लावून घेतलेल्या तिच्या सेल्फींनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत स्वतःची काळजी घेणारी प्रियंका चाहत्यांना खूप आवडली आहे. याशिवाय काही फोटोंमध्ये ती घरात आराम करताना, चित्रपट पाहताना आणि शांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
प्रियंकाने या पोस्टसोबत “हा माझ्या सध्याच्या आयुष्यातील नव्या टप्प्याचा सॉफ्ट लॉन्च आहे” असं लिहिलं आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टमागे काही खास संकेत आहेत का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. काहींना वाटतं की ती आयुष्यातील नवीन सुरुवातीबद्दल बोलत आहे, तर काहींनी तिच्या आगामी प्रोजेक्ट्सशी याचा संबंध जोडला आहे.
या फोटोंमध्ये प्रियंकाची मुलगी मालती मेरी हिचीदेखील गोंडस झलक पाहायला मिळाली. मालती काही फोटोंमध्ये ग्रीटिंग कार्ड बनवताना दिसत आहे, तर काही ठिकाणी ती खेळण्यात रमलेली दिसते.
प्रियंका तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करतानाही काही फोटोंमध्ये दिसत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो डंप केवळ ग्लॅमरस नसून भावनिक आणि वैयक्तिक क्षणांनी भरलेला असल्याचं चाहत्यांना जाणवलं.
प्रियंका चोप्राच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या आकर्षक स्टाईल, नैसर्गिक सौंदर्य आणि आत्मविश्वासाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, प्रियंका लवकरच ‘वाराणसी’ या चित्रपटातून भारतीय सिनेमात पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या कमबॅकची उत्सुकता वाढली आहे.





