‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी होणार सज्ज? श्रेया बुगडेने दिली हिंट

Chala Hawa Yeu Dya | झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या शोमधील पात्र प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहेत. हा शो बंद झाल्यानंतर चाहते कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहत होते. यातच आता या कार्यक्रमाबाबत अभिनेत्री श्रेया बुगडेने चाहत्यांसाठी दिलासादायक माहिती दिली आहे.
श्रेयस तळपदे होस्ट करत असणाऱ्या ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमाध्ये श्रेया आणि अभिनेता गौरव मोरे पोहोचले होते. या कार्यक्रमातील स्पर्धकांसह स्किट सादर करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी श्रेयस आणि श्रेयामध्ये झालेल्या संभाषणावरुन ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
View this post on Instagram
कार्यक्रमात श्रेयस तळपदे श्रेया बुगडेला म्हणतो की, “महाराष्ट्रभर लोक तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात. त्यांना तुला पुन्हा पुन्हा पाहावसं वाटतं, तर मग काहीतरी ठरव.”
श्रेयसने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत श्रेया बुगडे म्हणाली, “मी देखील प्रेक्षकांना आणि मंचावर परफॉर्म करणं खूप मिस करते. आपल्याला माहित आहे, झी मराठी प्रेक्षकांना कधीच नाराज करत नाही. मी देखील काहीतरी कुजबूज ऐकली आहे. प्रेक्षकही उत्सुक खूप आहेत, लोकं ही विचारत आहेत पण मला देखील नक्की काय ते माहित नाही.”
यावर श्रेयस म्हणतो, “तू दिलेली ही हिंट आपल्या स्मार्ट प्रेक्षकांना समजली असेल.” त्यामुळे आता पुन्हा एकदा ‘चला हवा येऊ द्या’ पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. Chala Hawa Yeu Dya |
यावेळी श्रेयस गौरव आणि श्रेया दोघांनाही म्हणतो की, ‘आशा करतो की तुम्ही दोघांनी लवकरात लवकर या मंचावर परफॉर्म करावं, हीच प्रेक्षकांची इच्छा आहे.’ यावरुन श्रेयासोबत गौरव देखील या कार्यक्रमाचा भाग असणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. Chala Hawa Yeu Dya |
हेही वाचा :





