Loni Kalbhor : प्रत्येक गावात विकासगंगा पोहोचवणार – सभापती काकडे
Loni Kalbhor : हवेली पंचायत समिती तसेच इतर विविध माध्यमातून मंजूर झालेल्या हवेली तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार कटके व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

लोणी काळभोर : हवेली तालुक्याच्या प्रत्येक गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हवेली पंचायत समिती कटिबद्ध असून, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्याच्या प्रत्येक गावागावात विकासगंगा पोहोचवण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.
हवेली पंचायत समिती तसेच इतर विविध माध्यमातून मंजूर झालेल्या हवेली तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार कटके व आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपसभापती विद्या गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समितीचे सदस्य कृषीराज चौधरी, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, सुषमा मुरकुटे, कोमल कांबळे, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, उपअभियंता निरंजन जाधव, आव्हाळवाडीचे माजी सरपंच प्रशांत आव्हाळे, उपसरपंच अमोल आव्हाळे, पल्लवी आव्हाळे, मांजरीचे माजी सरपंच रूपेश उंद्रे, निखिल उंद्रे, यशवंतचे संचालक किशोर उंद्रे, माजी संचालक तुकाराम पवार, रामभाऊ कुंजीर, आबा काळे, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सुरेश कुंजीर, चंद्रकांत मेमाणे, नयन तुपे, बापू घुले, संदीप कुंजीर, अमर कुंजीर, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, भाजप जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, संग्राम कोतवाल, उरुळी कांचनचे माजी सरपंच मयूर कांचन, भाऊसाहेब कांचन, सागर कांचन, माजी उपसभापती हेमलता बडेकर, कदमवाकवस्तीचे प्रतीक काळभोर, सुशील महाराज काळभोर, ॲड. सुजित कांबळे, सर्व गावचे सरपंच, प्रशासक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
मूलभूत सुविधांवर भर
भूमिपूजन कार्यक्रमांतर्गत आव्हाळवाडी, मांजरीखुर्द, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळीकांचन, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या गावातील विविध विकासकामांचे नारळ फोडण्यात आले. हवेली तालुक्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि पालखी मार्गांच्या विकासावर विशेष भर दिला आहे.





