भारती सिंह दुसऱ्यांदा आई होणार? स्वत:च केला खुलासा

Bharti Singh | लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंहने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सध्या ती ‘लाफ्टर शेफ्स सीझन 2’ या शोमध्ये दिसत आहे. मात्र आता सोशल मीडियार भारती सिंह प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगत आहेत. याबाबत तिला चाहत्याकडून प्रश्न विचारण्यात आला असता, त्यावर तिने स्वत: खुलासा केला आहे.
एका चाहत्याने भारतीला ‘तु प्रेग्नेंट आहे का? ‘ असा प्रश्न विचारला होता. त्यावर भारतीने उत्तर देत म्हटलं की, ‘मी प्रेग्नेंट नाहीय परंतु मला आता आई होण्याची इच्छा आहे. कारण आता गोला 3 वर्षाचा झाला आहे. त्यामुळे हीच आई होण्याची योग्य वेळ आहे. मी चाहत्यांना विनंती करते की, त्यांनी प्रार्थना करावी की, मी लवकरच एका मुलीचीही आई व्हावी.’
तिची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती खरंच आई होणार आहे का? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहेत. भारतीने स्वतःच्या व्लॉगमधून यावर खुलासा केला आहे. Bharti Singh |
भारती सिंहने याआधीही अनेकदा तिच्या दुसऱ्या बाळाच्या इच्छा जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत. यातच आता तिने स्वत: दुसऱ्यांदा आई होण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. यानंतर सध्या सोशल मीडियावर भारतीच्या प्रेग्नेंसीबाबत चर्चा रंगत आहेत. भारती आणि हर्ष यांनी डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं होती. 3 एप्रिल 2022 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. Bharti Singh |
हेही वाचा :
नरेश म्हस्केच्या विधानावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल ,म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात श्रेयवादाची लढाई’…





