Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? उदय सामंतांनी दिली मोठी हिंट
Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात दिले होते. आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या आश्वासनाबाबत भाष्य करत योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये दिले जातील, असे संकेत दिले आहेत. ()Ladki Bahin Yojana
‘आम्ही दिलेला शब्द पाळणार’; उदय सामंत काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. हा शब्द सरकार पाळणार असून, योग्य वेळी महिलांना वाढीव रक्कम दिली जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार असून, ती कोणीही बंद करू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला. (Ladki Bahin Yojana)
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद (खंडाळा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक आधारासाठी या योजनेचे पैसे महत्त्वाचे असल्याचे सांगत, महिलांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. (Ladki Bahin Yojana)
2100 रुपयांचा हप्ता नेमका कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, वाढीव रक्कम नेमकी कोणत्या महिन्यापासून मिळणार, याबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. (Ladki Bahin Yojana)
उदय सामंत यांनी योग्य वेळी वाढीव रक्कम देण्याचा शब्द दिल्याने महिलांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात 2,100 रुपयांचा हप्ता कधीपासून सुरू होणार, यासाठी सरकारच्या अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Ladki Bahin Yojana)
राज्यात 1 कोटी 66 लाखांहून अधिक लाभार्थी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. (Ladki Bahin Yojana)
या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. केवायसी प्रक्रियेनंतरच्या आकडेवारीनुसार राज्यात 1 कोटी 66 लाख 28 हजार 48 महिला या योजनेच्या लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana)
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यापूर्वी ही योजना सुरूच राहणार असल्याची भूमिका मांडली आहे. आता उदय सामंत यांनी 2,100 रुपयांच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केल्याने वाढीव हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)





