३१ मार्च रोजी रमजान ईदनिमित्त बँका खुल्या राहणार की बंद? RBI ने घेतला मोठा निर्णय

Bank News | येत्या ३१ मार्च रोजी ईद असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. मात्र बँक कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी नसेल. हा दिवस आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अखेरचा कामकाजाचा दिवस असल्याने बँका सुरू राहणार आहेत. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाची कामं हाताळली जातात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना एक परिपत्रक पाठविले आहे की सरकारी व्यवहार मिटविण्यासाठी 31 मार्च रोजी बँका खुल्या असतील. मात्र या प्रसंगी ग्राहकांसाठी सामान्य बँकिंग सुविधा उपलब्ध होणार नाहीत. आर्थिक वर्ष व्यवस्थित बंद व्हावं यासाठी आरबीआयनं सरकारी व्यवहार करणाऱ्या बँकांना ३१ मार्च रोजी कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
३१ मार्च २०२५ रोजी सुट्टी रद्द
सर्व सरकारी देयके, कर आणि वित्तीय नोंदींमध्ये विलंब किंवा विसंगती होऊ नये हे यामागचं उद्दीष्ट आहे. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. Bank News |
३१ मार्चला बँकेतील कोणत्या सेवा उपलब्ध असणार?
सरकारी कर भरणा : आयकर, जीएसटी, सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क भरणं
पेन्शन आणि सरकारी सबसिडी : सरकारी योजनांशी जोडलेली देयकं
सरकारी वेतन व भत्ते : सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन व इतर देयकं, सरकारी योजनांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार.
ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू
दरम्यान, 31 मार्च रोजी बँकांमधील सामान्य ग्राहक कदाचित त्यांचे दैनंदिन काम करू शकणार नाहीत, परंतु सर्व बँकांच्या ऑनलाइन सेवा सुरूच राहतील. या दिवशीही लोक ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने त्यांचे सर्व काम हाताळू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही महत्त्वाचं काम असेल तर अगोदरच करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळता येईल. याशिवाय पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2025 मध्ये, उत्सव आणि साप्ताहिक सुट्टीसह 16 दिवस बँका बंद राहतील. Bank News |
हेही वाचा:




