रक्षाबंधनाच्या दिवशी बँका बंद असणार का? महत्वाचे काम करायचे असल्यास आताच जाणून घ्या…

Rakshabandhan Bank Holiday | संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उद्या अर्थात 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण आहे. मात्र तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करायचे असेल, तर सोमवारी बँक चालू राहील का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यामुळे तुमचे बँकांसंबधित काही कामे असल्यास खोळंबा होऊ शकतो. मात्र उद्या काही ठिकाणी बँका चालू राहणार आहेत.
महाराष्ट्रातील बँका चालू असणार का?
सोमवारी रक्षाबंधन असल्याने अगरतळा, अहमदाबाद, भूवनेश्वर, देहरादून, जयपूर, कानपूर, लखनौ आणि शिमला या ठिकाणी बँका बंद असतील. तर देशात उर्वरित ठिकाणी बँका चालू राहतील. तसेच 19 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बँका देखील चालू राहणार आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी नसेल. त्यामुळे तुमचे बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ती तुम्हाला करता येऊ शकतात.
ऑगस्ट महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी ?
– ऑगस्ट महिन्यात एकुण 13 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यात आता 20 ऑगस्ट 2024 रोजी श्री नारायण गुरु जयंती असल्याने कोची आणि तिरुअनंतपूरम या ठिकाणी बँका बंद असतील.
– 24 ऑगस्ट रोजी चौथा शनिवार आणि 25 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे.
– 26 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव असल्याने अहमदाबाद, भूवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, शिमला, पटना, रायपूर, रांची आणि शिलाँग या ठिकाणी बँका बंद असतील.
दरम्यान, कॅश ट्रान्झाक्शनसाठी एटीएमचा वापर करु शकता. तसेच ऑनलाईन बँकिंगचीही सुविधा चालू राहणार आहेत. त्यामुळे बँकेच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही ऑनलाईन व्यवहार सहजरित्या करू शकतात.
हेही वाचा:





