Bigg Boss Marathi New Season । ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेशने सूरजचे भरभरून कौतुक केले. तर ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश भाऊने सदस्यांच्या आठवड्याभराच्या कारनाम्यांची शाळा घेतली.
आज रविवारी ‘भाऊचा धक्का’ विशेष असणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘अबीर गुलाल’ या मालिकेची टीम येणार आहे. त्यांचा जबरदस्त कल्ला पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आजच्या भागात सूरज चव्हाणच्या ‘बहिणीची एन्ट्री’ होणार आहे. आज होणाऱ्या विशेष भागाचा प्रोमो समोर आला आहे.
View this post on Instagram
प्रोमोमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘अबीर गुलाल’ या मालिकेतील कलाकार अक्षय केळकर, गायत्री दातार आणि पायल जाधव आले आहे. अशात सूरज चव्हाणला अभिनेत्री पायल जाधव राखी बांधणार आहे. यादरम्यानचा प्रोमो व्हायरल झाला. पायल सुरुजला राखी बांधताच सूरज पायलच्या पाया पडतो. यावेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आता सुरजचे कौतुक होत आहे.
दरम्यान, अक्षय केळकर (अगस्त्य), गायत्री दातार (शुभ्रा) आणि पायल जाधव (श्री) या कलाकारांनी सदस्यांना एक मजेदार टास्कदेखील दिला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सगळे सदस्य ट्रॉफीसाठी लढत आहेत. त्यामुळे कारस्थानी काका, आगलावी आत्या, खाष्ट सासू, भांडकुदळ बहिण, रडकी सून, पाहुणा कलाकार अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतील ट्रॉफी सदस्यांनीच एकमेकांना दिलेल्या आजच्या भागात दिसून येतील.