दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाणार? ‘आप’च्या नेत्याने दिले स्पष्टीकरण

Arvind Kejriwal | दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. तर दहा वर्ष सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. इतकेच काय तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झाला. यामुळे आता केजरीवाल आपचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या जागेवर पंजाबमधून राज्यसभेवर जातील अशा चर्चा सुरू आहेत. यावर आम आदमी पक्षाने स्पष्टीकरण दिले आहे.
‘आप’च्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाणार नाहीत. पूर्वी मीडिया सूत्रांनी सांगितले होते की ते पंजाबचे ते मुख्यमंत्री होतील. आता मीडिया सूत्रांकडून असे म्हटले जात आहे की, ते राज्यसभेतून निवडणूक लढवतील. हे दोन्ही स्रोत पूर्णपणे चुकीचे असल्याची माहिती कक्कड यांनी दिली.
संजीव अरोरांना मिळाली संधी
आम आदमी पक्षाचे लुधियाना येथील आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचे मागच्या महिन्यात निधन झाले, त्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. याठिकाणी संजीव अरोरा यांना तिकीट देण्यात आले आहे.
पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आलेले मूळचे लुधियानाचेच असलेले खासदार संजीव अरोरा हे पंजाबातील मोठे उद्योगपती व राज्यातील प्रमुख निर्यातदार आहेत. २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून आलेले अरोरा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. मात्र अद्याप या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. Arvind Kejriwal |
हेही वाचा:
Pune : विद्यार्थ्यांची मज्जा! मार्च, एप्रिल महिना सुट्ट्यांचा; जाणून घ्या कोणते आहेत दिवस?





