सलमानच्या किक 2 मध्ये अभिनेता रणदिप हुडा दिसणार? पॅाडकास्टमध्ये विचारलेल्या प्रश्नावर म्हणाला…

Randeep Hooda | Kick 2 | ईदच्या दिवशी बॅालीवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित सिंकदर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करण्यात आले. मात्र, चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फार काही कमाल करू शकला नाही. सुरुवातीचे काही दिवस सिंकरदला बऱ्यापैकी प्रेक्षकवर्ग मिळवता आला. मात्र, त्यानंतरच्या दिवसांमध्ये सिंकदरला प्रेक्षकांचा संंमिश्र प्रतिसाद मिळाला.
आता सलमानच्या किक २ चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. किक या चित्रपटाने इतिहास रचत बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घातला होता. त्यामुळेच या चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मात्यांनी याचा पुढचा भाग आणण्याचे ठरवले आहे. लवकरच या चित्रपटावर काम करण्यास सुरूवात होणार आहे. किक २ मध्ये अभिनेता रणदीप हुडा दिसणार का अशी देखील चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
किकचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी किक २ चित्रपटावर काम करण्यास लवकरच सुरूवात होईल, असे सांगितले होते. तेव्हापासून या चित्रपटाविषयीच्या चर्चांना वेग प्राप्त झाला होता. किकमध्ये अभिनेता रणदिप हुडाने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. यामुळे रणदिप किक २ चा हिस्सा होणार का असा प्रश्न युट्यूबर शुभंकर मिश्राने रणदिपला पॅाडकास्टमध्ये विचारला होता.
मिश्राने रणदिपला पॅाडकास्टमध्ये किक २ विषयी विचारणा केली. तसेच या चित्रपटात त्याची काय भूमिका असणार असा थेट प्रश्न केला. यावर, ते मला माहित नाही म्हणत किक २ येणार आहे, पण तो कधी येणार हे आम्हाला माहित नाही. साजिद भाई यात जास्त गुंतलेले आहेत, असे उत्तर रणदिपने दिले. या चित्रपटाचा मी एक भाग असणार का याबद्दल मला फारशी माहिती नाही. पण यावर विचार करत असल्याचे रणदिपने सांगितले.





