‘खतरों के खिलाडी’च्या 15 व्या सीझनमध्ये होणार बोल्ड अभिनेत्रीची एन्ट्री?

Khatron ke Khiladi 15 | लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’च्या 15 व्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या मागील सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यातील खतरनाक स्टंट्स नेहमीच प्रेक्षकांनाही एक वेगळा अनुभव देतात. यातच आता यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. अनेक सेलिब्रिटींना शोसाठी विचारण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
‘खतरों के खिलाडी 15’साठी अभिनेत्री मल्लिका शेरावतला विचारण्यात आल्याचे म्हंटले जात आहे. 48 वर्षीय मल्लिका रोहित शेट्टीच्या शोमध्ये दिसू शकते. मल्लिकाला या शोमध्ये पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
या स्पर्धकांच्या नावाची चर्चा
सध्या सोशल मीडियावर ‘खतरों के खिलाडी 15’ सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादीत व्हायरल होत आहे. ज्यात अभिषेक मल्हान, ईशा सिंह, गौतम गुलाटी, मनीषा रानी, एल्विश यादव, सिद्धार्थ निगम, चुम दरांग, ओरी, गुलकी जोशी, शगुन पांडे, रजत दलाल, भाविका शर्मा यांचा समावेश आहे. परंतु मल्लिकाला या शोमध्ये पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत. Khatron ke Khiladi 15 |
दरम्यान, मल्लिका शेरावत हॉट आणि बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. २० वर्षांहून अधिक काळातील कारकीर्दीत मल्लिकाने मर्डर, वेलकम, विक्की विद्या का वो वाला वीडियो, डर्टी पॉलिटिक्स, तेज, डबल धमाल, डरना जरूरी है, प्यार के साइड इफेक्ट्स, शादी से पहले, बचके रहना रे बाबा आणि ख्वाहिश यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. चित्रपटांनंतर मलायकाने आपली वाट टीव्ही शोकडे वळवली आहे. Khatron ke Khiladi 15 |
हेही वाचा:
‘धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा’; गंभीर आरोप करत अंजली दमानियांची मागणी





