पिंपरी | पत्नीची आत्महत्या; पतीला अटक
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – पतीच्या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पतीला अटक केले. हा प्रकार बुधवारी (दि. 12) मोशी येथे घडला.
धनंजय सुरेश जाधव (वय 33 रा. शिरूर, नांदेड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्वंभर व्यंकटराव दुधाडे (वय 34 रा.मोशी) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीला आरोपी पती हा वारंवार मारहाण करत पैशांची मागणी केली. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.





