ICC Women’s World Cup 2022 | बायकोने वर्ल्डकप फायनलमध्ये ठोकलं शतक; नवरा स्टार्ककडून हिलीचं खास अभिनंदन

ख्राइस्टचर्च – अॅलिसा हिलीचे दमदार दीड शतक आणि गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड महिला संघाचा पराभव करत सातव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ संपूर्ण संघ 43.4 षटकांत 285 धावांत बाद झाला.
ऑस्ट्रेलियाच्या विजयात अॅलिसा हिलीची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. हिलीने फलंदाजी करताना तुफानी शतक झळकावलं. तिचा हा पराक्रम पाहण्यासाठी तिचा नवरा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही उपस्थित होता. तो सामना पाहण्यासाठी स्टँडमध्ये बसला होता.
अॅलिसाने 138 चेंडूत 26 चौकारांच्या 170 धावांची दणकेबाज खेळी केली. त्यावेळी तिच्या पतीने उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि तिचं अभिनंदन केलं.
न्यूझीलंडकडून नेटाली स्किव्हर हिने एकाकी झुंज देत न्यूझीलंडचं आव्हान कायम राखलं. मात्र तिला दुसऱ्या बाजुने साथ मिळाली नाही. तिने नाबाद 148 धावा केल्या. मात्र संघाचा पराभव टाळण्यात ती अपयशी ठरली.





