WI vs ENG : वनडेनंतर आता टी-20 मालिकेचा थरार…! वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा, 4 स्फोटक खेळाडूंचे झालं पुनरागमन…

West Indies vs England T20 Series : अलीकडेच वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. ज्यावर वेस्ट इंडिजने 2-1 ने कब्जा केला. शाई होप एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. आता दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यासंदर्भात वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये चार धडाकेबाज खेळाडू संघात परतले आहेत. मात्र, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठीच या संघाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व रोव्हमन पॉवेलकडे असेल तर इंग्लंड संघाचे नेतृत्व जोस बटलरकडे असेल.
4 खेळाडूंचे झालं पुनरागमन…
एकदिवसीय मालिकेनंतर आता चाहत्यांना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक टी-20 मालिका पाहायला मिळणार आहे. ही मालिका 10 नोव्हेंबर रविवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी वेस्ट इंडिज संघात चार धडाकेबाज खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. ज्यामध्ये आंद्रे रसेल, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर आणि अकिल हुसेन यांचा समावेश आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजने श्रीलंकेसोबत टी-20 मालिका खेळली होती, ज्यामध्ये हे चार खेळाडू संघाचा भाग नव्हते. या चार स्फोटक खेळाडूंच्या एंट्रीने वेस्ट इंडिजचा संघ अधिक मजबूत दिसणार आहे.
🚨BREAKING NEWS🚨
CWI name the T20I squad against England in The Rivalry, Nov 9 – 17.💥#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/VPxFGlAf7h
— Windies Cricket (@windiescricket) November 8, 2024
रोमन पॉवेल पुन्हा एकदा वेस्ट इंडिज टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफवर पहिल्या दोन टी-20 सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे आता त्याच्या जागी मॅथ्यू फोर्ड खेळताना दिसणार आहे.
हेड-टू-हेड रिकाॅर्ड…
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, ज्यामध्ये वेस्ट इंडिजने 17 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघ 13 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
पहिल्या दोन टी-20 साठी वेस्ट इंडिजचा संघ – रोमन पॉवेल (कर्णधार ), शिमरन हेटमायर, शाई होप, रोस्टन चेज, निकोलस पूरन, एविन लुईस, आंद्रे रसेल, मैथ्यू फोर्डे, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, टेरेंस हिंड्स, अकील हुसैन, शमर जोसेफ, ब्रेंडन किंग, गुडाकेश मोती.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियानं डर्बन गाजवलं, पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला 61 धावांनी लोळवलं…
मालिकेचे वेळापत्रक – वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 10 नोव्हेंबरला, दुसरा सामना 11 नोव्हेंबरला, तिसरा सामना 15 नोव्हेंबरला, चौथा सामना 17 नोव्हेंबरला आणि पाचवा सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे. मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार पहाटे 1.30 वाजता सुरू होतील.

