WI vs ENG T20 : इंग्लंडचा वेस्टइंडिजविरूध्दच्या मालिकेवर 3-1 ने कब्जा, पावसामुळे पाचवा सामना रद्द…

England vs West Indies T20 Series : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सेंट लुसिया येथे खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. यासह इंग्लंडने ही मालिका शानदार पद्धतीने जिंकली आहे. त्यांनी वेस्ट इंडिजचा 3-1 असा पराभव केला. मालिकेत सर्वाधिक 9 विकेट्स घेणारा इंग्लंडचा साकिब महमूद मालिकावीर ठरला. त्याने 9 पैकी 8 विकेट्स या पॉवरप्लेमध्ये पटकावल्या आहेत.
The fifth T20I has been abandoned due to heavy rain, meaning we claim the series 3-1.
Thank you to our hosts @windiescricket for an excellent pair of series 👏
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/LXRlvLfDZ1
— England Cricket (@englandcricket) November 17, 2024
वास्तविक, पाचव्या सामन्यासाठी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वेस्ट इंडिजसाठी एविन लुईस आणि शाई होप सलामीला आले. या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. लुईसने 20 चेंडूत 29 धावा केल्या. तर होपने 14 धावा केल्या. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने 5 षटकात एकही बिनबाद 44 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि तो थांबलाच नाही. त्यामुळे अखेर हा सामना रद्द करावा लागला.
इंग्लंडने केला मालिकेवर कब्जा…
इंग्लंडने मालिकेची सुरुवात विजयाने केली. पहिला सामना त्यांनी 8 विकेटने तर दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला. पहिला व दुसरा सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला. त्यानंतर सेंट लुसिया येथील तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव केला आणि मालिका आपल्या नावावर केली. वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत 5 गडी राखून विजय मिळवला पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर मालिकेतील शेवटचा सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला.
Border-Gavaskar Trophy 2024/25 : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत चेतेश्वर पुजारा दिसणार एका नव्या भूमिकेत…
मालिकेत सर्वाधिक धावा कोणी केल्या?
फिलिप सॉल्टने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 4 डावात 162 धावा केल्या. रोव्हमन पॉवेल दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने 4 डावात 153 धावा केल्या. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत साकिब महमूद (Saqib Mahmood) अव्वल राहिला. त्याने एकूण 9 विकेट घेतल्या.





