Amethi Lok Sabha Elections| लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठीच्या जागेबाबत काँग्रेसकडून सपेन्स ठेवण्यात आला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीतून पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. अगदी शेवटच्या क्षणाला येथून उमेदवार जाहीर करण्यात आला. काँग्रेसकडून स्मृती इराणी यांच्या विरोधात केएल शर्मा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आणि राहुल गांधी यांच्यासाठी रायबरेलीची जागा निवडण्यात आली. अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा बालेकिल्ला मानली जाणारी ही जागा आता भाजपकडे असून स्मृती इराणी येथून खासदार आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधा अमेठीतील जागा का लढवणार नाहीत? असा प्रश्न वारंवार विचारण्यात आला होता. त्यावर आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी खुलासा केला आहे. काय म्हणाले अशोक गेहलोत? Amethi Lok Sabha Elections| अशोक गेहलोत म्हणाले की, “केएल शर्मा हे 40 वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. राहुल गांधींनी अमेठीला जाण्याची गरज नाही, हा पक्षाचा निर्णय आहे. कारण तिथे फक्त केएल शर्माच भाजपसोबत लढू शकतील. गांधी परिवाराच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस काम करणारी व्यक्ती उमेदवार झाली आहे.” पुढे ते म्हणाले, “राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. ते रायबरेलीच्या जागेवरूनही विजयी होतील. अमेठीत फक्त केएल शर्माच विरोधकांशी सामना करतील. जनताच म्हणत आहे की त्यांना असा कार्यकर्ता मिळाला आहे जो त्यांचे ऐकतो, आवाज उठवतो आणि त्यांच्यासाठी काम करतो. आजपर्यंत जनतेचे मत दिल्लीत पोहोचले नाही, परंतु केएल शर्मा सक्रिय झाल्यानंतर ते ऐकले जात आहे.”Amethi Lok Sabha Elections| केएल शर्माबाबत अशोक गेहलोत म्हणाले, “ते आधीपासून काम करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते सक्रिय आहेत आणि सोनिया गांधी यांनाही त्यांचे काम माहित आहे. कोणीही निवडणूक लढवली असेल, मग ते सतीश शर्मा असत, राहुल गांधी असो की सोनिया गांधी असो, प्रत्येकाने केएल शर्मा यांचे काम पाहिले आहे आणि मला माहित आहे की, अमेठीच्या लोकांच्या समस्या देखील त्यांना माहित असून त्यासाठी ते योग्य कामही करतील.” हेही वाचा: ‘निवडणूक भाजपने जिंकल्यास उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी तुरूंगात जातील..’ – अरविंद केजरीवाल