Jayant Patil : विलिनीकरणासाठी 12 तारीखच का ठरवली? जयंत पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले “दादांची ती इच्छा…”
Jayant Patil : दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा घटनाक्रम आणि तारखेबाबत जयंत पाटलांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

Jayant Patil : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १४ तारखेला एकत्र येणार असल्याची घोषणा करण्यात येणार होती, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून एकत्र येण्याबाबत तब्बल १४ बैठका झाला होता, अशी मोठी माहिती समोर आली आहे.
१७ जानेवारीला एकत्रीकरणाबाबत शेवटची बैठक झाली होती, असा दावा देखील केला जात आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. एकत्रीकरणाची तारीख ठरवण्याची जबाबदारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर सोपवण्यात आली होती. याबात जयंत पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली असून, एकत्रीकरणा बाबतचा घटनाक्रम सविस्तर सांगितला.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झाली आणि शेवट १२ तारीख निश्चित करण्यात आली. जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर आम्ही 12 तारखेला सगळं जाहीर करायचा असे ठरवले होते, असा मोठा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला. असे असले तरी दुसऱ्या बाजूला एकत्रीकरणावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून बोलणे टाळले जात असल्याचे दिसत आहे.
१२ तारीख दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची ठरली असल्याचे समोर आल्यानंतर त्या अगोदर अनेक घडामोडी घडल्या आहेत. याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, 16 तारखेला मी सगळेच एकत्रित जमलं होतं त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढू आणि आघाडीत लढवल्यानंतर निकाल लागल्यानंतर आठ तारखेला आपण जाहीर करू.

जयंत पाटील यांनी विलिनीकरणावर भाष्य करत चर्चा झाल्याचे सांगितले आहे.
पण दिल्लीला एका लग्नासाठी आम्ही सगळे जाणार आहोत, तर त्यांनी सांगितलं जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे, मग आम्ही दहाला किंवा बाराला जाहीर करू असं सांगितलं होतं. मध्ये चार-पाच दिवस सर्व फर्मिलिटी करायला लागतील. त्यानंतर 12 तारीख आम्ही जाहीर करण्याचे निश्चित केले, असा सर्वात मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.
अजित पवार जर मुख्यमंत्री झाले असते तर दादांनी महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे काम केलं असतं, एकदा काम ठरलं की त्याचे अंमलबजावणी कशी करायची यामध्ये अजितदादांचा हातखंडा होता. त्यामुळे अजित पवार एक चांगले मुख्यमंत्री बनले असते, अशी प्रतिक्रिया जयंत पाटीलांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेवर दिली.
राष्ट्रवादी एक येण्याबाबत बोलताना जयंत पाटीलांनी, मी ज्या नेतृत्वासोबत चर्चा करत होतो तेच नेतृत्व आता नाही, आता ज्यांच्याकडे पक्षाशी निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी आता तो निर्णय घेऊन अजित दादांचा शेवटचा स्वप्न पूर्ण करावं, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली.





