Karan Razdan: “आमिर-जुहीचा बहुचर्चित ‘टाइम मशीन’ चित्रपट का रखडला? करण जोहरच्या ऑफरमुळे लेखक नाराज”
Karan Razdan करण राजदान यांनी अवघ्या तीन महिन्यांत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहून पूर्ण केले. ही कथा ऐकल्यानंतर शेखर कपूर खूप उत्साहित झाले. त्यांनी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी यांनाही ही कथा ऐकवली. त्याचप्रमाणे आमिर खान, परेश रावल आणि इतर कलाकारांनाही कथा आवडली होती.

Karan Razdan: बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची घोषणा मोठ्या उत्साहात होते. काही चित्रपट प्रदर्शित होतात, तर काही विविध कारणांमुळे कायमचे डब्यात जातात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘टाइम मशीन’. दिग्दर्शक शेखर कपूर, अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जुही चावला यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. आता या चित्रपटाचे लेखक आणि चित्रपट निर्माते करण राजदान यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प का थांबला, यामागचे कारण सांगितले आहे.
करण राजदान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘टाइम मशीन’ हा चित्रपट विज्ञान, इतिहास आणि भावनिक नात्यांचा संगम असलेली एक वेगळी कथा होती. चित्रपटात आमिर खानचे पात्र चुकून टाइम मशीनद्वारे भूतकाळात, थेट महाभारताच्या काळात पोहोचते. त्याला सुरुवातीला आपण कुठे आलो आहोत, याची कल्पना नसते. जाग आल्यानंतर त्याला युद्धाचा आवाज ऐकू येतो. खाली पाहिल्यावर महाभारताचे युद्ध सुरू असल्याचे त्याच्या लक्षात येते. त्याच वेळी त्याची भेट भगवान श्रीकृष्णांशी होते. ही कथा त्या काळात खूप वेगळी आणि नाविन्यपूर्ण मानली जात होती. (Karan Razdan)
या चित्रपटाची कल्पना कशी सुचली, याचाही खुलासा करण राजदान यांनी केला. त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील आणि शेखर कपूर यांच्या आईचे सहा महिन्यांच्या अंतराने निधन झाले होते. त्या दुःखातून दोघेही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्या काळात दोघे ‘दुश्मनी’ या चित्रपटावर काम करत होते. चर्चा करताना, “जर भूतकाळात जाऊन आपल्या प्रिय व्यक्तींना पुन्हा भेटता आले तर?” असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच ‘टाइम मशीन’ची संकल्पना जन्माला आली. (Karan Razdan)

Karan Razdan
करण राजदान यांनी अवघ्या तीन महिन्यांत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहून पूर्ण केले. ही कथा ऐकल्यानंतर शेखर कपूर खूप उत्साहित झाले. त्यांनी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी यांनाही ही कथा ऐकवली. त्याचप्रमाणे आमिर खान, परेश रावल आणि इतर कलाकारांनाही कथा आवडली होती.
मात्र, पुढे हा चित्रपट आर्थिक आणि निर्मितीच्या अडचणीत अडकला. करण राजदान यांनी सांगितले की, अनेक निर्मात्यांनी हा चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामध्ये करण जोहर, मनमोहन शेट्टी आणि रमेश तौरानी यांचाही समावेश होता. करण जोहर यांच्याकडे स्क्रिप्ट पाठवण्यात आली होती. त्यावेळी धर्मा प्रॉडक्शन्समध्ये अभिनेता जुगल हंसराज स्टोरी विभागाचे प्रमुख होते. (Karan Razdan)
राजदान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना करण जोहर यांना प्रत्यक्ष कथा सांगायची होती. मात्र, त्यांना सांगण्यात आले की करण जोहर स्वतः स्क्रिप्ट वाचणे पसंत करतात. त्यानंतर या स्क्रिप्टसाठी त्यांना २५ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली. ही रक्कम अत्यंत कमी असल्याचे राजदान यांना वाटले. त्यांनी नाराजी व्यक्त करत, “मी तुम्हाला सोनं देतोय आणि तुम्ही त्याची किंमत पितळीसारखी लावत आहात,” अशी प्रतिक्रिया दिली.
यानंतर निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनीही हा चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. करण राजदान यांनी राकेश रोशन यांच्या घरी संपूर्ण कथा ऐकवली होती. त्या वेळी हृतिक रोशनही उपस्थित होता. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, यावर एकमत न झाल्याने हा प्रकल्प पुन्हा रखडला. (Karan Razdan)
दिग्दर्शक म्हणून राजकुमार संतोषी यांच्या नावाचाही विचार झाला होता. मात्र, करण राजदान यांना हा विषय त्यांच्या शैलीला साजेसा वाटत नसल्याने त्यांनी त्याला विरोध केला.
अनेक मोठी नावे, वेगळी कथा आणि दमदार कलाकार असूनही ‘टाइम मशीन’ हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र, आजही हा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या अपूर्ण चित्रपटांपैकी एक मानला जातो.





