Vaibhav Sooryavanshi Dropped : द्रविडच्या नियमामुळे वैभव सूर्यवंशीचा पत्ता कट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी सेहवाग अन् द्रविडच्या लेकांची थेट एन्ट्री
Vaibhav Sooryavanshi Dropped : वैभव सूर्यवंशीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी अंडर-१९ मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्याने चर्चा सुरु झाली.

Vaibhav Sooryavanshi dropped from India Under 19 Squad against Australia Series : भारताचा अवघ्या १५ वर्षांचा युवा आणि स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी अंडर-१९ मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्याने चर्चा सुरु झाली. वरिष्ठ राष्ट्रीय संघात पदार्पण केलेला असताना आणि वयाचे निकष पूर्ण करत असतानाही त्याला संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, त्याला संघातून बाहेर ठेवण्यामागे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) एक अत्यंत महत्त्वाचा आणि जुना नियम कारणीभूत ठरला आहे.
राहुल द्रविडचा ‘तो’ नियम नडला; दुसऱ्यांदा खेळण्यास बंदी
बीसीसीआयने २०१६ मध्ये भारताचे माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड यांच्या शिफारशीनुसार एक विशेष धोरण लागू केले होते. या नियमानुसार, कोणताही खेळाडू आपल्या कारकिर्दीत फक्त एकदाच अंडर-१९ विश्वचषक खेळू शकतो. खेळाडूचे वय १९ वर्षांपेक्षा कमी असले तरी त्याला दुसऱ्यांदा विश्वचषक खेळण्याची मुभा नसते. वैभवने २०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले असल्याने तो पुढील विश्वचषकासाठी अपात्र ठरला आहे. त्यामुळे भविष्यातील विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवून निवडकर्त्यांनी नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी वैभवला या मालिकेतून विश्रांती दिली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये वॉशिंग्टन सुंदरलाही याच नियमाचा फटका बसला होता.
द्रविड-सेहवागच्या मुलांची एन्ट्री; १८ सप्टेंबरपासून थरार रंगणार
Vaibhav Sooryavanshi (15) missed India U-19 squad vs Australia.
• Reason: BCCI’s 2016 rule — no player can play more than one U-19 World Cup. He already featured in 2026. Same rule kept Washington Sundar out of 2018 WC.
• He’s already made his senior T20I debut vs England.… pic.twitter.com/TE015XEjp8
— Cricket Hub (@Anurag9793) August 28, 2026
भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-१९ यांच्यातील ही द्विपक्षीय मालिका १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. राजकोट येथे १८, २१ आणि २३ सप्टेंबर रोजी तीन ५० षटकांचे एकदिवसीय सामने खेळवले जातील. त्यानंतर राजकोट आणि अहमदाबाद येथे दोन बहुदिवसीय (रेड बॉल) सामने रंगतील. या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड यांची निवड करण्यात आली आहे. आर्यवीरची पहिल्यांदाच राष्ट्रीय ज्युनिअर संघात निवड झाली आहे.
नवीन प्रतिभेला संधी देण्यावर भर; बीसीसीआयचे दूरदृष्टीचे पाऊल!
वैभव सूर्यवंशीने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर आपली छाप पाडली असली, तरी बीसीसीआयच्या नियमांमुळे आता ज्युनिअर स्तरावर इतर नवीन खेळाडूंना घडवण्यावर भर दिला जात आहे. भारताच्या या आगामी अंडर-१९ संघात आर्यवीर आणि अन्वय यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांवर सर्वांचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतून भारतीय क्रिकेटमधील पुढील पिढीतील प्रतिभावान खेळाडूंची खरी परीक्षा घेतली जाणार आहे.





