Share Market Rise: ‘या’ 4 कारणांमुळे शेअर बाजारात अचानक आली तेजी; सेन्सेक्स 800 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 22,950 चा टप्पा
Share Market Rise: दरम्यान, आज फार्मा आणि ऑईल अँड गॅस क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या निशाण्यावर बंद झाले. निफ्टी स्मॉलकॅप-१०० आणि मिडकॅप-१०० मध्ये सुद्धा १ टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवण्यात आली.

Share Market Rise: सोमवार, ६ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजाराने सुरुवातीच्या घसरणीनंतर जोरदार पुनरागमन केले. सकाळच्या सत्रात मोठ्या घसरणीचा सामना करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीने दुपारनंतर सुसाट धाव घेतली. सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला, तर निफ्टीने २२,९५० ची पातळी ओलांडली. प्रामुख्याने अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याच्या बातम्यांमुळे बाजारात ही तेजी दिसून आली.

Share Market Rise: ‘या’ 4 कारणांमुळे शेअर बाजारात अचानक आली तेजी; सेन्सेक्स 800 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 22,950 चा टप्पा
व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स ७८७.३० अंकांच्या (१.०७%) वाढीसह ७४,१०६.८५ वर बंद झाला तर निफ्टी २५५.१५ अंकांच्या (१.१२%) वाढीसह २२,९६८.२५ वर बंद झाला. सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स ५९० अंकांनी घसरून ७२,७२८ वर, तर निफ्टी १७० अंकांनी कोसळून २२,५४२ वर गेला होता. मात्र, खालच्या स्तरावरून गुंतवणूकदारांनी केलेल्या तुफान खरेदीमुळे बाजार पुन्हा सावरला.
बाजारातील तेजीची ४ मोठी कारणे – Share Market Rise
१. अमेरिका-इराण युद्धविराम आणि पाकिस्तानचा प्रस्ताव:
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराणमधील तणाव संपवण्यासाठी पाकिस्तानने एक शांतता आराखडा तयार केला आहे. या प्रस्तावामुळे ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ पुन्हा व्यापारासाठी खुली होण्याची शक्यता आहे. या सकारात्मक बातमीमुळे जागतिक बाजारासह भारतीय गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.
२. भारतीय रुपयाची मजबूती:
आरबीआयने (RBI) घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे भारतीय रुपया सोमवारी डॉलरच्या तुलनेत ३३ पैशांनी वधारून ९२.८५ वर पोहोचला. रुपया मजबूत झाल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
३. बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी:
बँकिंग क्षेत्रात आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. निफ्टी बँक आणि निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स २ टक्क्यांपर्यंत वधारले. प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र (४.२%), बँक ऑफ इंडिया (४.१%) आणि बँक ऑफ बडोदा (३.५%) या बँकांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. मार्च तिमाहीचे बिझनेस अपडेट्स चांगले आल्यामुळे गुंतवणूकदारांनी बँकिंग शेअर्सला पसंती दिली.
४. आयटी (IT) क्षेत्रातील झेप:
आयटी कंपन्यांचे मार्च तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागतील, या आशेने गुंतवणूकदारांनी आयटी शेअर्समध्ये खरेदी केली. यामुळे निफ्टी आयटी इंडेक्समध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
दरम्यान, आज फार्मा आणि ऑईल अँड गॅस क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या निशाण्यावर बंद झाले. निफ्टी स्मॉलकॅप-१०० आणि मिडकॅप-१०० मध्ये सुद्धा १ टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवण्यात आली. Share Market Rise





