US Iran War: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इराणच्या अत्यंत शक्तिशाली आणि उच्चभ्रू लष्करी दल, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डसचे प्रमुख माजिद खादेमी हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार,” अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये त्यांचे गुप्तचर प्रमुख मारले गेले आहेत”.असे सांगण्यात येत आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, आयआरजीसीने आपल्या टेलिग्राम चॅनलवरील एका पोस्टमध्ये, “इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या गुप्तचर संघटनेचे शक्तिशाली आणि सुशिक्षित प्रमुख, मेजर जनरल माजिद खादेमी, अमेरिकन-झायोनिस्ट शत्रूने केलेल्या गुन्हेगारी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत.” म्हटले आहे. युद्धविरामच्या प्रयत्नांदरम्यान तेहरानवर हल्ले US Iran War: इस्रायल आणि अमेरिकेने सोमवारी संयुक्तपणे इराणवर हल्ल्यांची मालिका केली, ज्यात २५ हून अधिक लोक मारले गेले. इराणच्या सरकारी माध्यमांनी अधिक तपशील न देता वृत्त दिले की, या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये आयआरजीसीचे गुप्तचर प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचा समावेश होता. US Iran War: होर्मुझसाठी ट्रम्प यांचा इराणला अंतिम अल्टिमेटम US Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणला सातत्याने अल्टिमेटम देत आहेत. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी आपल्या मित्र राष्ट्रांसाठी पूर्णपणे खुली असल्याचा इराणचा वारंवार दावा आहे. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला पुन्हा एकदा मंगळवार रात्री ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी खुली असल्याच्या आपल्या भूमिकेचा इराणने पुनरुच्चार केला आहे. इशारा देताना ट्रम्प यांनी लिहिले की, “जर इराणने मंगळवारपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर तेथील वीज प्रकल्प आणि पुलांना लक्ष्य केले जाईल, ज्यामुळे तेथे नरकासारखी परिस्थिती निर्माण होईल. ” ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले, “मंगळवार हा इराणमध्ये ‘वीज प्रकल्प’ आणि ‘पूल दिवस’ म्हणून ओळखला जाईल, असा हा एक अद्वितीय दिवस आहे. “होर्मुझची सामुद्रधुनी ताबडतोब उघडा, नाहीतर नरकासारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार रहा – फक्त बघा! अल्लाहची स्तुती असो.”