Ravi Shastri : जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचा कर्णधार करण्यास रवी शास्त्रींचा विरोध, काय आहे कारण?

Ravi Shastri Opposes Jasprit Bumrah as Test Captain : टीम इंडियाचा भावी कसोटी कर्णधार कोण असणार? याबाबत लवकरच खुलासा होणार आहे. पण तत्पूर्वी क्रिकेट दिग्गज अजूनही त्यांचे मत मांडण्यात व्यस्त आहेत. या मतांच्या यादीत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही नाव जोडले गेले आहे. रवी शास्त्री म्हणाले की, जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाची कमान अजिबात दिली जाऊ नये. रवी शास्त्री असे का म्हणाले? ते जाणून घेऊया.
रवी शास्त्रींचा बुमराहच्या नावाला विरोध –
रवी शास्त्रींनी त्यामागील कारणही स्पष्ट केले आहे. त्यांनी शुबमन गिलला हा खरा कर्णधारपदाचा दावेदार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा आवडता खेळाडू ऋषभ पंतचे नावही सुचवले आहे. माजी प्रशिक्षकांचा असा विश्वास आहे की या दोन्ही खेळाडूंकडे शिकण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाकडे भारतीय कसोटी संघाची धुरा सोपवायला हवी. रवी शास्त्री म्हणाले की, जर तुम्ही जसप्रीत बुमराहला कसोटी कर्णधार बनवले, तर तुम्ही त्याला गोलंदाज म्हणून गमवाल.
🚨 SHUBMAN GILL – THE TEST CAPTAIN 🚨
– The Selection committee is planning a long term Captaincy transition and Gill is seen as the Ideal candidate as he has shown impressive leadership qualities. [Gaurav Gupta from TOI] pic.twitter.com/gakWgiZiqk
— Johns. (@CricCrazyJohns) May 16, 2025
रवी शास्त्रींचा बुमराहच्या नावाला काय आहे विरोध?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहने संघाचे नेतृत्व केले, पण त्याला दुखापत झाली आणि या दुखापतीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही. आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “माझ्या मते, ऑस्ट्रेलियातील मालिकेनंतर जसप्रीत हा सर्वोत्तम पर्याय असता. पण मला वाटते, जर तुम्ही जसप्रीतला कर्णधार बनवले, तर नंतर तुम्ही त्याला गोलंदाज म्हणून गमवाल. त्यामुळे मला वाटते की, त्याने एका वेळी एका सामन्यासाठी त्याचा फिटनेस तयार ठेवाव. कारण तो आता गंभीर दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे.”
हेही वाचा – व्वा रे पठ्ठ्या ! नीरज चोप्राने करून दाखवलचं; भालाफेकीत अखेर ९० मीटरचे अंतर गाठलं
रवी शास्त्री पुढे म्हणाले की, ते आयपीएल क्रिकेट खेळतात जे चार षटकांचे क्रिकेट असते. आता १० षटके आणि १५ षटके गोलंदाजीची कसोटी असेल. अशात तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी हवी आहे की कर्णधार म्हणून त्याच्या मनावर कोणताही दबाव नसावा. गिलबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, “तुम्ही एखाद्याला कर्णधार म्हणून तयार करत असाल, तर मी म्हणेन की त्यासाठी शुबमन चांगला पर्याय आहे. त्याला एक संधी द्या. तो २५, २६ वर्षांचा आहे, त्यालाही वेळ द्या.” विशेष म्हणजे गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनीही शुबमन गिलच्या नावाला पसंती दिल्याचे वृत्त आहे.





