राघव चढ्ढा प्रचारात का दिसत नाहीत? – आपच्या मंत्र्याने केला खुलासा
Updated On:

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या प्रचारातून पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा हे गायब असल्याची टीका भाजपकडून सातत्याने केली जात होती. त्यावर आता आम आदमी पक्षाचे दिल्लीतील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की चढ्ढा यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असून त्यासाठी ते सध्या लंडनला गेले आहेत.
त्यांना गंभीर नेत्रविकार झाला असून त्यांची दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही शस्त्रक्रीया वेळेवर करण्याची गरज होती. म्हणून ते लंडनला गेले असून शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते लगेच दिल्लीत परत येतील आणि पक्षाचा प्रचार सुरू करतील असेही भारद्वाज यांनी नमूद केले.





