Actress Prajakta Mali : मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीकडे पाहिले जाते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्राजक्ताची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. तिने आजवर अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम करून यश मिळवले आहे. प्राजक्ता ३६ वर्षांची झाली असून, अजून ती सिंगल का आहे असा प्रश्न तिला सतत विचारला जातो. तिने अनेकदा तिच्या सिंगल असण्यामागचे आणि अजून लग्न न करण्यामागचे कारण सांगितले आहे. अशातच आता प्राजक्ताने तिच्या इंन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ती अजूनही सिंगल का आहे? आणि तिला कसा मुलगा हवा आहे याविषयी सांगितले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीचे फॅन फॅालोविंग तब्बल २ मिलियनहून अधिक आहे. ती नेहमी हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर देखील सतत वावर असतो. प्राजक्ताला ट्रॅव्हलिंग करणे खूप आवडते. ती कुठेही गेली तरी तेथील फोटो, व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिला पुस्तक वाचनाचा छंद आहे. याशिवाय तिचा स्वतः प्राजक्ताराज नावाचा एक ज्वेलरी ब्रँडही आहे. प्राजक्ताच्या फोटोशूटला चाहते नेहमी लाइक्स आणि कमेंट्स करत असतात. सध्या प्राजक्ता हास्यजत्रामध्ये निवेदन करत आहे. प्राजक्ताने इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीत तिने “मी सिंगल आहे कारण मला लोक आवडत नाहीत. पण मला असा एक माणूस शोधायचा आहे जो लोकांना आवडत नाही, मला आवडतो आणि जो माझा द्वेष करत नाही.” असे म्हटले आहे. यामुळे चाहत्यांना तिला नेमका कसा मुलगा हवा आहे याबाबत समजले आहे. प्राजक्ताच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ती शेवटची फुलवंती चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. आता तिचा आगामी कोणता चित्रपट अॅानफ्लोअर आहे का याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हेही वाचा : षड्यंत्र की अपघात? ! लिबियाच्या लष्करप्रमुखांना घेऊन जाणारे विमान कोसळले ; चार अधिकाऱ्यांचाही दुर्दैवी मृत्यू