Hardik Leaves MI : विराटला मध्यस्थी करावी लागली, पण मुंबईचे सहकारी गप्प राहिले! हार्दिक पंड्याने का सोडली एमआयची साथ? पाहा VIDEO
Hardik Leaves MI : आयपीएल २०२७ च्या आधी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्समध्ये ट्रेड करण्यात आले. रोहित शर्माचे कर्णधारपद, चाहत्यांची नाराजी आणि संघाच्या कामगिरीमागील संपूर्ण कहाणी जाणून घ्या.

Hardik Pandya Leaves Mumbai Indians PBKS Trade Reasons Captaincy Row Dressing Room Rift : एकेकाळी मुंबई इंडियन्सला आपले कुटुंब मानणाऱ्या हार्दिक पंड्याचा या संघासोबतचा प्रवास अखेर संपुष्टात आला आहे. २०२४ मध्ये मोठ्या गाजावाजाने मुंबईत दुसऱ्यांदा परतलेल्या हार्दिकने आता अधिकृतपणे या फ्रँचायझीचा निरोप घेतला आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांसारखे मातब्बर दिग्गज संघात असतानाही व्यवस्थापनाने हार्दिककडे थेट कर्णधारपद सोपवले होते. मात्र, या एका निर्णयाने मुंबई इंडियन्सच्या गोटात सुरू झालेला अंतर्गत वाद आणि २०२६ च्या हंगामापर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळेच हार्दिकने संघ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रेक्षकांची हूटिंग अन् मुंबईच्या खेळाडूंचे मौन; विराटला यावे लागले पुढे
हार्दिकला कर्णधार केल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. वानखेडे स्टेडियमवर सामन्यांदरम्यान चाहत्यांनी हार्दिकविरुद्ध जोरदार घोषणाबाजी आणि हूटिंग केली. दुर्दैवाने, अशा कठीण प्रसंगात मुंबईच्या एकाही खेळाडूने किंवा रोहित शर्माने पुढे येऊन प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर विरोधी संघातील विराट कोहलीने सर्वात पहिल्यांदा मैदानावर मध्यस्थी करत चाहत्यांना हार्दिकची हुर्यो उडवणे थांबवण्याची हात जोडून विनंती केली होती. या प्रकाराने हार्दिक पूर्णपणे दुखावला गेला.
ड्रेसिंग रूममध्ये दोन गट; वाढता दबाव आणि कामगिरीवर परिणाम
https://t.co/j8IGBrsRTj ” we Never hated Hardik pandya”
#HardikPandya— Anjaneya (@Anjaneya_27) November 11, 2026
हार्दिकच्या नेतृत्वावरून ड्रेसिंग रूममध्ये उघडपणे दोन गट पडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. खेळाडूंमधील संवाद तुटल्यामुळे संघातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. या अंतर्गत संघर्षाचा थेट फटका मैदानातील कामगिरीवर बसला. मुंबई इंडियन्स २०२४ मध्ये गुणतालिकेत १० व्या स्थानावर फेकली गेली, २०२५ मध्ये कशीबशी प्लेऑफमध्ये पोहोचली, तर २०२६ च्या मोसमात पुन्हा ९ व्या स्थानावर घसरली.
मैदानातील निराशा ठरली अखेरचे कारण; पंजाबकडे प्रस्थान
The day Hardik Pandya gave away his Mumbai Indians jersey to the fans, I knew something wasn’t right. It felt like the beginning of the end of his MI journey.
Hardik, thanks for your services! 💙
Your second stint with MI was somewhat like Hamza Ali Mazari’s mission in Pakistan. You did the job, but we are still unsure whose side you were really on 😂
— Akul (𝑨𝑻10) (@Loyalsachfan10) November 11, 2026
वाढत्या दबावामुळे हार्दिकचा संयम सुटल्याचे अनेकदा मैदानावर दिसले. एका सामन्यादरम्यान निराशा अनावर झाल्याने त्याने थेट आपली जर्सी काढून प्रेक्षकांच्या दिशेने फेकली होती; कदाचित त्याच क्षणी त्याने मुंबई सोडण्याचा निर्धार केला असावा. अखेर सर्व वादांवर पडदा टाकत त्याने पंजाब किंग्सकडे जाण्याचा निर्णय घेतला.





