गोव्याला चाललायेत का? तर हि बातमी नक्की वाचा

"आरटी-पीसीआर' बंधनकारक

पुणे  – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आता गोव्यात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना देखील आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील प्रवाशांना निगेटिव्ह रिपोर्ट बाळगण्याचे आवाहन केले आहे.

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय विविध राज्यांकडून प्रवासाबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. बंगाल पाठोपाठ आता गोवा सरकारने देखील आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातून देखील गोवा एक्‍स्प्रेस धावत असून, देशाच्या विविध भागातून गोव्यात ये-जा करणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तासापूर्वी चाचणी करणे गरजेचे असून, प्रवाशांनी चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे जवळ बाळगणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे पालन करत प्रवाशांनी अहवाल सोबत ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अत्यावश्यक प्रवासासाठी ‘असा’ बनवा ई-पास! Https://Covid19.Mhpolice.In/

पृथ्वी शॉला आंबोली पोलिसांचा दणका; विना ई-पास मित्रांसोबत प्रवास करत असल्याने कारवाई

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.