या खास कारणामुळे बिपाशाने केले करण सिंग ग्रोवरसोबत ‘लग्न’

Bipasha basu – 2015 मध्ये आलेल्या ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू यांची भेट झाली. चित्रपटात एकत्र काम करत असताना दोघांमधील जवळीक वाढू लागली, आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये लग्न केले. मात्र इतक्या वर्षांनंतर आता अभिनेत्रीने करणसोबत लग्न करण्याचे कारण उघड केले आहे.
View this post on Instagram
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहे. दोघांनाही त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्या लाडक्या लेकीसोबत घालवायला आवडते. अलीकडेच या जोडप्याने त्यांची लाडकी मुलगी देवीचा पहिला वाढदिवसही साजरा केला. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत, पण आता लग्नाच्या 7 वर्षांनंतर अभिनेत्रीने करण सिंग ग्रोवरबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे आणि तिने करणला जोडीदार म्हणून का निवडले हे देखील सांगितले आहे. या जोडप्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये पापाराझी बिपाशाला विचारतात की, तुला ‘फाइटर’चा टीझर कसा वाटला? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली की, मला सगळेच हॉट वाटतात. करण हॉट आहे, नाहीतर मी त्याच्याशी लग्न का केले असते? मात्र, हे म्हटल्यावर बिपाशा हसते आणि नवऱ्याचे प्रेमाने लाड करू लागते. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच बिपाशाने करणशी लग्न का केले हे सांगितले आहे.
बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांची लेक देवी यांच्या जन्मानंतर ३ महिन्यांनंतर या जोडप्याला समजले की त्यांच्या मुलीच्या हृदयात छिद्र आहे. या बातमीने दोघेही भारावून गेले. जणू त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये स्वतः बिपाशा बसूने याचा खुलासा केला होता.





