MP Election Result 2023 : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार स्थापन होणार? सध्या ट्रेंडनुसार भाजप आघाडीवर…

Madhya Pradesh Election Result 2023 Live Updates : मध्य प्रदेशात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरूवात पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीने झाली. राज्यात 17 नोव्हेंबरला निवडणुका झाल्या आणि निकाल समोर येणार आहे.
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मध्य प्रदेशातील सर्व 230 विधानसभा जागांसाठी ट्रेंड समोर आले आहेत. सुरुवातीलाच भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप 140 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 86 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ 6,978 मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान, राज्यात काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष प्रचंड बहुमताने विजयाचा दावा करत आहेत. तथापि, निकालांचे ट्रेंड काही वेळातच दिसू लागतील. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासोबत जितू पटवारी यांनीही मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 230 पैकी 135 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात दणदणीत विजयाचा दावा केला आहे.
Madhya Pradesh 2018 मध्ये विधानसभेच्या 230 जागांपैकी काँग्रेसने 114, भाजपने 109, बहुजन समाज पक्षाने दोन, समाजवादी पक्षाला एक आणि चार उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाले होते.





