Wholesale inflation | घाऊक महागाई झाली कमी

Wholesale inflation | गेल्या आठवड्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली असतानाच आज घाऊक किमतीवर महागाईची आकडेवारी जाहीर झाली. यानुसार जानेवारी महिन्यामध्ये घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक कमी होऊन 0.27% इतका नोंदला गेला आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान घाऊक महागाई शून्य टक्क्यांपेक्षा कमी होती. नोव्हेंबरपासून ही महागाई वाढत होती. नोव्हेंबरमध्ये घाऊक महाागाई 0.39 टक्के इतकी होती. आता अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्यामुळे ही महागाई जानेवारी महिन्यात 0.27% इतके नोंदले गेली आहे. डिसेंबर महिन्यात ही महागाई 0.73 टक्के होती. त्यामध्ये आता बरीच घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात किरकोळ किमतीवरील महागाई कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे दिसून येते.
डिसेंबर महिन्यामध्ये होते 9.38% प्रमाण ( Wholesale inflation ) –
उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने या आकडेवारी बद्दल समाधान व्यक्त केले आहे. जानेवारी महिन्यात घाऊक किमतीवरील अन्नधान्याच्या किमती कमी होण्याचे प्रमाण 6.85 टक्के इतके होते. डिसेंबर महिन्यामध्ये हे प्रमाण 9.38% इतके होते. केंद्र सरकारने अन्नधान्याचा पुरवठा वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती कमी होत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम किरकोळ आणि गाव किमतीवर होत असल्याचे सांगण्यात आले.
सरकारने साखर, तांदूळ, गहू निर्यातीला मर्यादा घातल्या आहेत. तर खाद्यतेल आणि डाळींच्या आयातीला पूरक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे या बाबींचा देशात पुरवठा वाढला. त्याचबरोबर केंद्र सरकारने समांतर कांदा, तांदूळ, गहू पुरवठा सुरू केला असल्यामुळे महागाई कमी होण्यास मदत मिळत असल्याचे सांगण्यात आले.
मात्र भाजीपाल्याच्या किमती अजूनही जास्त आहेत. हा सरकारच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. जानेवारी महिन्यात भाजीपाल्याच्या किमती वाढण्याचे प्रमाण 19.71 टक्के होते. ते डिसेंबर महिन्यातील 26.3 टक्क्यापेक्षा कमी झाले असले तरी अजूनही या क्षेत्रावर काम करण्यास भरपूर वाव आहे. मात्र भाजीपाल्याचे दर पुरवठा आणि मागणीप्रमाणे बदलत असतात. भाजीपाला आयात करण्यास फारच कमी व्हावा आहे.





