घाऊक महागाईच्या दरातही वाढ
Updated On:

नवी दिल्ली – गेल्याच आठवड्यात किरकोळ किमतीवरील महागाई 7 टक्क्यांच्या पुढे गेल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. घाऊक किमतीचा आधारावरील महागाईतही सप्टेंबर महिन्यात वाढ झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात घाऊक किमतीवर आधारित महागाईचा 1.32 टक्के इतका भरला आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे ही महागाई वाढत असल्याचे सांख्यिकी मंत्रालयाने म्हटले आहे.
ऑगस्ट महिन्यात ही महागाई 1.16 टक्के इतकी होती. त्या अगोदर चार महिने या महागाईचा दर शुन्य टक्क्यापेक्षा कमी होता. महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे रिझर्व्ह बॅंकेने गेल्या पंधरवड्यात जाहीर केलेल्या पतधोरणांमध्ये व्याजदरात बदल केलेले नाहीत.





