‘द लंचबॉक्स’ चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये इरफान खानची जागा कोण घेणार?

Lunchbox Sequel | दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या ‘द लंचबॉक्स’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात इरफानसोबत निम्रत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचीही भूमिका होती. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच ऑस्कर विजेती निर्माती गुनीत मोंगा पत्रकार कोमल नाहटा यांच्या पॉडकास्टमध्ये आली होती. यावेळी तिने ‘द लंचबॉक्स’ च्या सीक्वेलवर भाष्य केलं.
यावेळी त्यांना विचारले गेले की, सिनेमात दिवंगत इरफानच्या जागी कोणत्या अभिनेत्याला घेऊ शकता. यावर त्यांनी ‘द लंचबॉक्स’च्या सीक्वेलमध्ये इरफानच्या भूमिकेसाठी मी अनिल कपूरला घेऊ इच्छिते, असे सांगितले. Lunchbox Sequel |
‘द लंचबॉक्स’ ची गोष्ट साजन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीवर असते जो मुंबईत एकटाच राहत असतो. तर दुसरीकडे इला ही महिला डबा सर्विस देत असते. एक दिवस डिलीवरी चुकते आणि तो डबा इरफानला पोहोचतो. त्यात एक चिठ्ठीही असते. यानंतर दोघांमध्ये चिठ्ठ्यांचा सिलसिला सुरु होतो. शेवटी भेटायचं ठरल्यावर साजन मात्र इलाला दुरुनच पाहतो आणि भेटणं टाळतो. हाच सिनेमाचा क्लायमॅक्स असतो. Lunchbox Sequel |
दरम्यान, अनिल कपूर यांनी”मिस्टर इंडिया”, “लम्हे”, “नायक”, “दिल धड़कने दो” आणि “द नाइट मॅनेजर” सारखे उत्कृष्ट चित्रपट केले आहे. नुकतेच ते “वॉर २” मध्ये दिसले होते. लवकरच ते शाहरुख खानच्या “किंग” चित्रपटामध्येही दिसणार आहेत. Lunchbox Sequel |
हेही वाचा:





